Friday, May 17, 2024

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा १०० वा वाढदिवस, खास कार्यक्रमांचे आयोजन

हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी या  १०० वर्षांच्या होत आहेत. १८ जून रोजी हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आपल्या आईला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबाद येथे उपस्थित राहणार आहेत.
हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पंतप्रधानही उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी, शिवपूजा व भजन संध्याचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पावागढ येथील माँ काली मंदिरात नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील.
पंतप्रधानांच्या दौऱ्याची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. पावागड येथे येत असताना, नरेंद्र मोदी यांचं त्यांच्या आईवर किती प्रेम आहे हे त्यांच्या अनेक फोटोज मधून दिसून येत असतं.

Latest Posts

Don't Miss