Sunday, May 19, 2024

Latest Posts

Promise Day2023, तुम्हीही करता प्रॉमिस डे साजरा? मग जाणून घ्या याचे महत्व काय

प्रॉमिस डे (promise day) दिवशी प्रेमात असलेले युवक-युवकी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देतात. तुम्हाला माहित असेल कि, व्हॅलेंटाईन ची सुरवात ७ फेब्रुवारीपासून (7 February) होते, हा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) साजरा केला जातो.

प्रॉमिस डे (promise day) दिवशी प्रेमात असलेले युवक-युवकी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देतात. तुम्हाला माहित असेल कि, व्हॅलेंटाईन ची सुरवात ७ फेब्रुवारीपासून (7 February) होते, हा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) साजरा केला जातो. यातील पाचव्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. आठवड्याच्या पाचव्या दिवशी येतो आणि हा दिवस एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि त्यातील गूढता दर्शवतात. तुम्हाला माहित आहे का वचन दिन हा जागतिक रित्या साजरा केला जातो व व्हॅलेंटाईन दिनी (Valentine’s Day) साजरा होणाऱ्या प्रॉमिस डे शी याचा काही संबंध नसतो. पण या दिनामुळे एकमेकांवरील विश्वास अजून वाढतो. पण याचे महत्व कोणाला माहित आहे का

याची अशी काही खास कथा नाही पण महत्व आहे. यावेळी गुरुवारी प्रॉमिस डे येत आहे. हा दिवस, जो व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी येतो, एकमेकांना दिलेल्या वचनांचे पालन करून हा दिवस साजरा होतो,परंतु यातील महत्वाची गोष्ट म्हणजे, व्हॅलेंटाईन वीक मधील हा प्रॉमिस डे ११ फेब्रुवारीला साजरा केला जातो,काही लोक त्याला जागतिक वचन दिना असल्यासारखे मानतात पण हे दोन्हगी दिवस वेगळे आहेत. हे दोन्ही दिवस सारखे नाहीत कारण तो व्हॅलेंटाईन वीकचा भाग नाही तसेच प्रॉमिस डे हा दिवस व्हॅलेंटाईन डेचा एक खास भाग आहे जो तुम्हाला तुमच्या साथीदारासोबत मजबूत बंध बनवतो.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्याच्यावरील विश्वास कायम असणे हे त्याने दिलेलले खूप मोठे वाचन असते आणि नात्याला अनेक वर्ष झाली तरी तो विश्वास कायम असतो हे साजरे करणे त्याहीपेक्षा आनंदाचे असते तुमच्या आयुष्यातील वचनबद्धता दाखवते की तुम्ही तुमच्या आयुष्यातील व्यक्तींना किती महत्त्व देता.खरं तर या दिवशी आपल्या आयुष्यात असलेल्या व्यक्तीचे आभार मानण्याचाही दिवस असतो. ११ फेब्रुवारी (February 11) रोजी साजरा केला जाणारा, प्रॉमिस डे ही जोडप्यांना व्यक्त करण्याची संधी आहे की ते कोणत्याही परिस्थितीत अशी तरी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील आणि ते एकमेकांवर खूप प्रेम आणि समर्थन करतील असे ठाम वचन देतात.

हे ही वाचा : 

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Google Doodle ने मल्याळम सिनेमातील पहिल्या महिला लीडचा केला सन्मान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss