Monday, May 13, 2024

Latest Posts

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की…Gulabi Sadi न्यूयॉर्कमध्ये झळकली

गायक संजू राठोड याने नव-नवीन गाण्यांमुळे कमी वेळेत प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. ‘गुलाबी साडी’ हे गाणं आता ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’ मध्ये दिसत आहे. आनंदाची बातमी म्हणजे हे त्याचं पहिलच मराठी गाणं आहे. गायक म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये एवढ्या लवकर प्रसिद्धी मिळेल, असं मला कधीच वाटलं नव्हत. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, एवढं यश मिळालं. या गाण्याने दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. 

माझा आनंद मला शब्दात व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य माझ्या चाहत्यांमुळे झाल आहे असे संजूने सांगितले आहे. “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ” या गाण्याच्या ओळी आणि संपूर्ण गाणं इतकं व्हायरल झालंय की त्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही डान्स केला आहे. जागतिक वायरल गाण्यामध्ये गुलाबी साडी या गाण्याचा समावेश केला आहे. ‘नऊवारी साडी’ या गाण्याने पण महाराष्टाला वेड केलं होतं. संजू राठोड हा जळगाव तांडा या ठिकाणी लहानाचा मोठा झाला. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याला गायनाची आवड होती. दहावीनंतर त्याने डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे.   

हे ही वाचा:

Taarak Mehta Ka Ooltah Chashmahचा सोढी गेला तरी कुठे?

घरच्यांच्या चिंतेत वाढ नाश्तासाठी शेवयाचा उपमा नक्की ट्राय करा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss