Odisha Train Accident नंतर हजारो लोकांनी रेल्वे तिकिटे रद्द केली?

या रेल्वे अपघाताची चौकशी सुरू आहे. आता या संदर्भात सीबीआयने देखील पुढाकार हा घेतला आहे. त्याचबरोबर या अपघातानंतर रेल्वेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

Odisha Train Accident नंतर हजारो लोकांनी रेल्वे तिकिटे रद्द केली?

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास २७५ नागरिकांचा मृत्यू तर ९०० हून अधिक नागरिक हे जखमी झाले होते. या रेल्वे अपघाताची चौकशी सुरू आहे. आता या संदर्भात सीबीआयने देखील पुढाकार हा घेतला आहे. त्याचबरोबर या अपघातानंतर रेल्वेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. असाच एक दावा काँग्रेसकडून करण्यात आला की, शुक्रवारी (२ जून) झालेल्या अपघातानंतर मोठ्या संख्येने लोकांनी भीतीपोटी आपली रेल्वे तिकिटे रद्द केली.

 रेल्वे तिकीट बुकिंगचे व्यवस्थापन करणाऱ्या आयआरसीटीसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते भक्तचरण दास यांनी एक दिवस आधी सोमवारी (५ जून) दावा केला होता की, ओडिशाच्या दुर्घटनेनंतर लोकांमध्ये रेल्वेबद्दल भीती आहे, त्यामुळे हजारो लोकांनी तिकीट रद्द केले. काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून त्यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे, ज्यामध्ये ते सांगत आहेत की, यापूर्वी कधीही असा रेल्वे अपघात झाला नव्हता. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले. या घटनेने सर्वांचे मन दुखावले आहे.

IRCTC काय म्हणाले?

तसेच अपघातानंतर हजारो लोकांनी तिकिटे रद्द केली आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करणे सुरक्षित नाही, असे त्यांना वाटते. काँग्रेसचा हा व्हिडिओ शेअर करताना आयआरसीटीसीने याला चुकीचे म्हटले आहे. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, हे वास्तवात चुकीचे आहे. रद्दीकरण वाढलेले नाही. याउलट, रद्दीकरण १ जून २०१३ रोजी ७.७ लाख (अपघाताच्या एक दिवस आधी) ३ जून २०२२ रोजी ७.५ लाखांवर घसरले.

तर आज दिनांक ६ जून रोजी सकाळी काँग्रेसने या दुर्घटनेवरून केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, सुमारे ३०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आजही या मृत्यूंना कोण जबाबदार आहे याचे उत्तर नाही? या देशातील सामान्य माणूस रेल्वेने प्रवास करतो. उद्या तुम्ही, तुमचे कुटुंब आणि देशातील जनता ट्रेनमध्ये बसाल, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही हा प्रवास तुमच्या जबाबदारीवर करत आहात, सरकारची जबाबदारी नाही.

हे ही वाचा:

आज Sulochana Didi यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

१९ जूनच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?, ‘मिशन ४५’ला फायदा होईल अशांनाच मंत्रिपद?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version