Thursday, May 2, 2024

Latest Posts

गौतम अदानी मागे टाकत मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, येथे जाणून घ्या संपूर्ण यादी

तर दुसरीकडे, रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता $८४.३ अब्ज झाली आहे.

रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याने सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. फोर्ब्सने ही माहिती दिली आहे. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती $८३.९ अब्ज झाली आहे. तर दुसरीकडे, रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता $८४.३ अब्ज झाली आहे. फोर्ब्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी आता १०व्या क्रमांकावर आहेत, तर अंबानी ९व्या क्रमांकावर आहेत. अहवालानुसार, गेल्या २४ तासांत अदानी यांना १० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

जगातील टॉप-१० श्रीमंतांची यादी

सध्या टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती २१४ अब्ज डॉलर आहे. एलोन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांचे नेटवर्थ $ १७८. ३ अब्ज (Elon Musk Networth) आहे. यानंतर जेफ बेझोस (Jeff Bezos) १२६.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

लॅरी एलिसन ($१११.९ अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर, वॉरेन बफे $१०८.५ अब्ज डॉलरसह पाचव्या आणि बिल गेट्स $१०४.५ अब्ज डॉलरसह सहाव्या क्रमांकावर आहेत. कार्लोस स्लिम हेलू ९१.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. लॅरी पेज ८५.८ अब्ज डॉलर्ससह ८व्या स्थानावर असून मुकेश अंबानी ९व्या स्थानी आणि गौतम अदानी १०व्या स्थानावर आहेत.

हे ही वाचा:

Budget 2023 विमा कंपन्यांना बजेटचा झटका, कंपन्यांचे शेअर घसरले १४ टक्क्यांनी

बजेटवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss