Friday, May 3, 2024

Latest Posts

बसमधील जागेवरून दोघांचं भयंकर भांडण; व्हिडिओ झाला व्हायरल

काहीवेळा ट्रेन मध्ये जागेवरून भांडणं होतात. अशा भांडणांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकले जातात. नेटकरी असे व्हिडिओ आवर्जुन पाहतात.

ट्रेन मधून प्रवास करताना अनेकदा आपण कडाक्याच्या होणाऱ्या भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. कधी गर्दीच्या ठिकाणी रस्त्यात मारामारी सुरू झाली तर लोकं थांबून ही भांडणं बघतात. काहीवेळा ट्रेन मध्ये जागेवरून भांडणं होतात. अशा भांडणांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकले जातात. नेटकरी असे व्हिडिओ आवर्जुन पाहतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होतोय.
हा व्हिडिओ (Viral Video) एका बस मधील असून एका सीटवर दोन वयस्कर मंडळी बसली आहेत. पहिला दुसऱ्याला जागा आहे तुम्ही सरका तर दुसरा पहिल्याला जागा नाहीये म्हणून सांगतोय. खूप वेळ हे दोघे जागा आहे, जागा नाही यावरून वाद घालत आहेत. त्यांच्या भांडणामुळे व्हिडिओ बघणाऱ्या खरंच त्यांच्यात जागा आहे का असा प्रश्न पडतो.
https://twitter.com/i/status/1543571793470173184
व्हिडिओ मधील मजेशीर गोष्ट
दोघांचे हे भांडण खूप वेळ चालते. त्या दोघांमध्ये इतर प्रवासी मध्यस्थी सुद्धा करत नाहीयेत. दोघे ही व्हिडिओ मध्ये नीट बसलेले दिसून येत आहेत. मात्र त्यांचे भांडण नेमके कशावरून सुरू झाले हे कळत नाहीये. हा भांडणाचा व्हिडिओ (Twitter /saga scam) या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.  या व्हिडिओची (Viral Video) मजेशीर गोष्ट म्हणजे, टाकणाऱ्याने गमतीशीरपणे व्हिडिओवर, ९ वा गुलाब जामुन खाल्ल्यानंतर, मी माझ्या पोटाशी भांडताना.. असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अधिक गमतीशीर झाला आहे. याच गोष्टीचा आनंद घेत अनेकांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान शेअर केला आहे.

Latest Posts

Don't Miss