Friday, May 17, 2024

Latest Posts

VIRAL VIDEO – सिग्नल वर महिलेने केले असे काही की व्हिडिओ पाहून नेटकरी भावनिक झाले

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघतो. काही व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही. सिग्नल ला गाडी थांबली असता एक लहान मुलगा एका दुचाकीवर स्वार महिले जवळ आला व महिलेने लहानग्याचे प्रेमाने गाल ओढले आहेत. या व्हायरल व्हिडिओ मधील महिलेचे अनेकांनी कौतुक केले आहे.

१० जून रोजी डॉ. अजयिता प्रवास करत असताना एका सिग्नल वर त्यांची गाडी थांबली. त्यावेळी त्यांच्या समोर एक लहान मुलगा एका बाईक स्वाराजवळ आला. बाईक वर पाठी बसलेल्या महिलेकडे तो भीक मागू लागला. अचानक या मुलाच्या डोळ्यात काहीतरी जातंय हे पाहून बाईकवर बसलेल्या महिलेने त्या मुलाला जवळ घेत त्याच्या डोळ्यात फुंकर घालून डोळ्यातला कचरा काढला. हे पाहून त्या गरीब निरागस मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आलं. ते निरागस हास्य पाहून त्यांनी त्या मुलालाच्या हातावर काही पैसे टेकवले. त्यांनी दिलेले पैसे पाहून तो चिमुकला ही खूश होऊन निघून गेला.

अगदी काहीच सेकंदाच्या या व्हिडिओ ने अनेकांना भावनिक केले आहे. गरीब – श्रीमंतीतला भेद पुसून टाकणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनतो आहे. हा व्हिडीओ डॉ. अजयिता यांनी ट्विटरवर शेअर करताच तो प्रचंड व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओ ला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आजकाल आपल्या जवळच्या माणसांकडे प्रेम व आपुलकी व्यक्त करायला अनेकांना जमत नाही पण हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावनिक झाले आहेत.

Latest Posts

Don't Miss