भाजपच्या पराभवावर ठाकरेंची जळजळीत प्रतिकिया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसनं बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्टच झालीत जमा आहे.

भाजपच्या पराभवावर ठाकरेंची जळजळीत प्रतिकिया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसनं बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्टच झालीत जमा आहे. भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातल्या नेत्यांनीही हा पराभव मान्य करून विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे. या निकालावर आता देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाला बहुमत देखल मिळालं आहे. या निवडणुकीमुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर काँग्रेससोबत असलेल्या भाजपविरोधी पक्षांनाही यामुळं काही प्रमाणात बळ मिळालं आहे. त्यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या निकालावर भाष्य करताना मोदी – शहांवर जळजळीत टीका केली आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्नाटकच्या निकालावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, दक्षिण भारत हा आता पूर्णपणे भाजपच्या हातून गेला आहे. देशभरात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारण लोकांना आवडलेलं नाही, हे कर्नाटकात दिसून आलं आहे. त्यामुळं भाजपला जनतेनं हद्दपार केलं आहे, त्याचप्रकारे आता महाराष्ट्रातूनही भाजपला हद्दपार करण्याची गरज आहे, असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा हा पराभव असल्याची जळजळीत टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, एका बाजूला कर्नाटक निवडणुकीचे निकाल येत होते तर दुसरीकडं उद्धव ठाकरे पक्षाची मोर्चेबांधणी करत होते. हा निकाल आपल्या बाजूनंच कसा आहे? याचं विश्लेषण उद्धव ठाकरेंनी बैठकीत केलं तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचवावं असे निर्देशही या बैठकीत त्यांनी दिले आहेत.शिवसेनेच्या बैठकीत जिल्हा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. कर्नाटकच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडूनही भविष्यातील रणनिती काय असेल यावर चर्चा झाली. १९ जूनला शिवसेनेचे वर्धापन दिन होणार आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्तानं वेगवेगळे संघटनात्मक कार्यक्रम घ्यावेत, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य व्हावं, यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचं यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार? दावेदार तीन पण मुख्यमंत्री पदाचा हकदार एकच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version