Saturday, May 18, 2024

Latest Posts

आरबीआय ‘हा’ नवा जुगाड, घरबसल्या नोटा जमा करा

मच्याकडे अजूनही 2000 रुपयांची नोट आहे, जी तुम्ही बँक (Bank) किंवा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कार्यालयात जाऊन बदलू शकत नाही किंवा त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही? RBI चे प्रादेशिक कार्यालय तुमच्यापासून लांब असेल तर काळजी करू नका, भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक नवीन पर्याय शोधला आहे.

तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांची नोट आहे, जी तुम्ही बँक (Bank) किंवा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कार्यालयात जाऊन बदलू शकत नाही किंवा त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही? RBI चे प्रादेशिक कार्यालय तुमच्यापासून लांब असेल तर काळजी करू नका, भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक नवीन पर्याय शोधला आहे. आरबीआयने आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नोंदणीकृत पोस्टाची सुविधा सुरु केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियुक्त प्रादेशिक कार्यालयांना तुम्ही 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टाने पाठवू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांपासून दूर राहणाऱ्यांसाठी हा एक सोपा पर्याय आहे.

नोटा जमा करण्यासाठी रांगेत उभे राहण्यापासून सुटका

बँकेमध्ये 2000 रुपयाच्या नोटा जमा आणि बदलण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी रांगेत उभे राहण्यापासून तुमची सुटका होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे प्रादेशिक संचालक रोहित पी. यांनी सांगितलं आहे की, आम्ही ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करत आहोत. यामुळे शाखेत जाण्याच्या आणि रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून ग्राहकांची बचत होणार आहे. TLR आणि विमा उतरवलेले पोस्ट हे दोन्ही पर्याय अत्यंत सुरक्षित आहेत आणि त्यामुळे या पर्यायांबद्दल लोकांनी मनात कोणतीही भीती ठेवू नये.

19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोट आता परत आल्या आहेत. या नोटा बदलून देण्याची किंवा बँक खात्यात जमा करण्याची अंतिम मुदत पूर्वी 30 सप्टेंबर होती. त्यानंतर ही मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. 7 ऑक्टोबरनंतर तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss