Wednesday, May 15, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2023, CAD मध्ये होणार वाढ, रोजच्या वापरातल्या वस्तू महागणार

केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget ) २०२३-२४ सादर होण्यासाठी अवघे तास शिल्लक आहेत. बजेट २०२३ च्या धावपळीत खूप बदल होत असताना सगळ्यांच्या मनात अर्थसंकल्प सादर होण्याची उत्सुकता वाढली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे पाचवे बजेट आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget ) २०२३-२४ सादर होण्यासाठी अवघे तास शिल्लक आहेत. बजेट २०२३ च्या धावपळीत खूप बदल होत असताना सगळ्यांच्या मनात अर्थसंकल्प सादर होण्याची उत्सुकता वाढली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे पाचवे बजेट आहे. महत्वाचे म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचे हे शेवटचे पूर्ण बजेटआहे. लोकसभा निवडणुकांचा विचार करता मोदी सरकार देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. या अर्थसंकल्पात आनंदाची बाब म्हणजे बऱ्याच वस्तूंवरील कर कमी होणार आहेत परंतु काही वस्तूंवरील कर दर वाढण्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:  Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

कोरोना काळानंतरचा हा अर्थसंकल्प मांडणे केंद्रीय सरकारला आव्हानात्मक जाणार आहे. केंद्रीय सरकारला अनेक आव्हनांचा सामना करावा लागणार आहे जसे कि यावेळी अनेक सामानांवर आयात कर वाढवला जाणार आहे. चालू खात्यातील वाढत्या तूट (CAD) वाढल्या आहेत . केंद्र सरकार ही तूट कमी करण्याचा प्रयत्न करणार याची शक्यता आहे. जर अत्यावश्यक वस्तूंवरील आयात कर (Import Duty) वाढला तर चालू खात्यातील तूटी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaramn) काही अत्यावश्यक वस्तूंवरील आयात कर वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

CAD मागील वर्षी चालू खात्यातील तूट (current account deficit) देशाच्या जीडीपीच्या २.२ टक्के होती. जी नंतर वाढत गेली व सप्टेंबरच्या तिमाहीत हि तूट जीडीपीच्या (Gross domestic product- GDP) ४.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. गेल्या ९ वर्षात दरम्यान हि तूट सर्वोच स्तरावर गेली आहे.यामुळे रोजच्या वापरातील वस्तू महागण्याची शक्यता आहे. जसे कि खासगी विमानं, हॅलिकॉप्टर्स, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिकचे सामान, हाय ग्लास पेपर, दागिने, विटामिन्स अश्या वस्तूंची किंमत वाढणार आहे.

हे ही वाचा:

अनुष्का शर्मानंतर हरमनप्रीत कौर बनणार प्युमा स्पोर्ट्स ब्रँडची नवी अॅम्बेसेडर

‘Pathaan’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर दीपिका – शाहरुखने दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss