Saturday, May 18, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2023, अर्थसंकल्पाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) या १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) या १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. २०२३ च्या अर्थसंकल्पनेत सादर झालेलया स्वतंत्र्यापूर्वीपासून आतापर्यंत किती बदल झाले हे तुम्हाला माहिती आहे का? पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? बजेट कुठे छापले गेले? अर्थसंकल्पना सादर करण्याची वेळ किती होती? रेल्वेचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पनात कधी सादर झाला? नक्की बजेटचा इतिहास काय आहे? या लेखात तुम्हाला या सर्व प्रश्नांनची उत्तरे मिळतील.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

ब्रिटिश परंपरेनुसार अर्थमंत्री अर्थसंकल्पीय कागदपत्रे लाल किंवा तपकिरी रंगाच्या पिशवीत ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत पोहचायचे. २०१९ पर्यत हा ट्रेंड चालू होता. निर्मला सीतारामन यांनी पददार स्विकारल्यानंतर या ट्रेंडमध्ये बदल झाला. २०२० मध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बजेटमध्ये सर्वात मोठा महत्वाचा बदल झाला तो म्हणजे सर्वकाही पेपरलेस झाले. १९९९ सालापर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ आणि दिवस हा निश्चित करण्यात आला होता. ब्रिटिश काळाच्या प्रथेनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केले जायचे. त्यानंतर १९९९ मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजता केली आणि त्यानंतर २०१७ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदली आणि ती १ फेब्रुवारी केली.

१९२४ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प (union budget) व्यतिरिक रेल्वे अर्थसंकल्पनाची प्रथा सुरु करण्यात आली. तेव्हापासून ते २०१६ पर्यंत रेल्वेचा अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केले जात होते. २०१७ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यावेळी असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पनेत विलीन करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर अर्थसंकल्पाचे विलीनीकरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. अरुण जेटली यांनी २०१७ मध्ये पहिला एकत्रित केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्र सरकारने नॉर्थ ब्लॉकमध्ये १९८० रोजी प्रिंटिंग प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून बजेट तेथे छापले जाते. बजेटचे कागदपत्रे छापण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित करण्यात येतो आणि त्या नंतर मग बजेट छापण्याची प्रक्रिया सुरु होते. १९५५ पर्यत केंद्रीय अर्थसंकल्प हा इंग्रजीत सादर केला जात होता त्यानंतर केंद्र सरकारने अर्थसंकल्पाचे पेपर्स हिंदी आणि इंग्रजीत असे दोन्ही भाषेत छापण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

Budget 2023, काळानुसार अर्थसंकल्पात झालेला बदल तुम्हाला माहित आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss