Wednesday, May 15, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2023, कोण व कसे करणार केंद्रीय अर्थसंकल्पाचे नियोजन ?

सरकार वार्षिक अर्थसंकल्प (Annual Budget) काढतो हे माहीत आहे पण याची प्रक्रिया काय? हे कसे काढले जाते? या बाबतीत अपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

सरकार वार्षिक अर्थसंकल्प (Annual Budget) काढतो हे माहीत आहे पण याची प्रक्रिया काय? हे कसे काढले जाते? या बाबतीत अपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय सरकार अर्थसंकल्प वार्षिक स्वरूपात काढतो. पुढील वर्षात किती खर्च करायचा आहे आणि हे पैसे कुठून येणार त्याचे नियोजन अर्थसंकल्पात केले जाते. तर आपण बघुयात अर्थसंकल्पाची तयारी कशी केली जाते.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. अर्थमंत्री दरवर्षी ६ महिन्याआधीच (6 months before) अर्थसंकल्पाच्या अंदाज पत्रकाची (estimate sheet) तयारी सुरू करतात. अर्थ मंत्रालय सर्व राज्यांना ६ महिन्याआधी एक पत्र पाठवते. ज्यामध्ये उत्पन्नाची गणना करण्याच्या सूचना दिल्या जातात. सूचनेप्रमाणे सर्व राज्यातील खर्च मोजला जातो मग उत्पन्न गोळा केले जाते अश्या प्रकारे खर्च उत्पन्न पडताळणी होते. सर्व राज्यातील खर्च आणि उत्पन्नाचा आढावा घेउन सरकार व अर्थमंत्री देशाचा आर्थिक परिस्थितीचा विकास करण्यासाठी व विविध उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक योजना आणि प्रकल्प आणले जातात ज्यामुळे पुढील वर्षीच्या अर्थव्यवस्थेला दिशा मिळते.

बजेट (budget) मध्ये दोन प्रकारचे खर्च असतात. महसूली खर्च (Revenue Expenditure) आणि भांडवली खर्च (Capital expenditure) आपल्या राज्यातील दैनंदिन खर्चाचा समावेश महसूल खर्चात केला जातो उदरणार्थ पगार, अनुदान, सबसिडी, व्याज. तसेच भांडवली खर्च म्हणजे ज्यातून मालमत्ता तयार होते.जसे की सरकारी गुंतवणूक, किंवा सरकारने केलेली गुंतवणूक याला सरकारी खर्च म्हणतात.

हे ही वाचा:

मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी केले १२०० पानांचे आरोपपत्र दाखल, ओरेवाचे एमडी जयसुख पटेलांच्या नावाचाही समावेश

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार!, अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

पंतप्रधान मोदींनी केली परीक्षा पे चर्चा, ३८ लाख विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss