Friday, May 3, 2024

Latest Posts

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

आता पुणे जिल्ह्यात आमदाराच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. परंतु आयोजकांना गौतमीचा हा कार्यक्रम आयोजित करणं चांगलंच महागात पडला.

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. आता गौतमी इतकी फेमस झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. तसेच आता गौतमीची क्रेझ इतकी जास्त वाढलीय की आता तर काही मंडळी स्वत:च्या, नातेवाईकाच्या, मुलांच्या, पत्नीच्या वाढदिवसानमित्तानेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आता राज्यातील एक जिल्हा नसेल तिथे गौतमीचा कार्यक्रम झाला नाही. गावाशिवातही गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. आता पुणे जिल्ह्यात आमदाराच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. परंतु आयोजकांना गौतमीचा हा कार्यक्रम आयोजित करणं चांगलंच महागात पडला.

गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाकणच्या मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आयोजकांनी कार्यक्रम घेतला होता. यामुळे आयोजक समीर गवारे, आनंद गवारे आणि विश्वनाथ गवारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

तर काही दिवसांपूर्वी एका मुलाने वाढदिवसासाठी गौतमीचा कार्यक्रमाचे आयोजन हे केले होते. परंतु या कार्यक्रमाचे आयोजन करणे हे तेव्हा बर्डथे बॉयला चांगलाच महागात पडला होता.बर्थडे बॉय असलेल्या अमित शंकर लांडे आणि आयोजक मयूर रानवडे यांनी सोमवारी वाढदिवसानिम्मित गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन हे केले होते. परंतु या दोघांवरही भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा सर्व कार्यक्रम निर्विघनपणे पार पडला परंतु असं होत असतानाच अमित लांडे आणि आयोजक मयूर रानवडे या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असताना देखील हा कार्यक्रम घेण्यात आला आणि म्हणूनच या दोन्ही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आता गौतमीचा कार्यक्रम आणि पोलीस हे जणू एक समीकरणच झाले आहे. आयोजक मयूर रानवडे यांनी कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे एक अर्ज देखील केला होता. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. परंतु तरीदेखील हा कार्यकारी घेण्यात आला. आणि म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

‘फकाट’च्या निमित्ताने Suyog Gorhe – Rasika Sunil यांची ‘हॅट्रिक’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss