Wednesday, May 1, 2024

Latest Posts

अब कि बार Sunetra Pawar, Baramati मधून Eknath Shinde यांची घोषणा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज (गुरुवार, १८ एप्रिल) सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, ‘अब कि बार, सुनेत्रा पवार’ हि घोषणा केली.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “व्यासपीठावर मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे. बारामतीत परिवर्तनाची आस आणि घडाळ्याची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. बारामतीत परिवर्तन होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी १५ वर्षे खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बाजार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे.बारामतीची लढाई हिऐतिहासिक लढाई असली तरी वैयक्तीक नाही. ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे.”

ते पुढे म्हणाले, “हि लोकसभेची निवडणूक फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही. ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. देश बलशाली, मजबूत आणि विकसित भारत बनवणारी निवडणूक आहे. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत.” “बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचाच काम अजित पवार यांनी केलं. अजितदादांवर अन्याय झाला आहे. म्हणून ते आमच्यासोबत आहेत. सुनेत्रा पवारांचे वक्तृत्व आणि कर्तुत्व चांगले आहे. म्हणून त्या नक्कीच खासदार होणार आहेत, ” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

BJP च्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी, CM Eknath Shinde यांचा अभिमन्यु झालाय, Shivsena नेत्याचे गंभीर आरोप

Udayanraje Bhosale जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss