Friday, May 10, 2024

Latest Posts

आमिर खानचा खतरनाक लूक होतोय व्हायरल,काय आहे नवीन प्रोजेक्ट?

आमिर खानचा खतरनाक लूक होतोय व्हायरल,काय आहे नवीन प्रोजेक्ट?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आमिर खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.सध्या आता आमिर खानच्या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक वाट पाहत असतात.अशातच आता त्याचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खानच्या हातात दगडासारखी दिसणारी वस्तू आहे. त्याचा लुक थक्क करणारा आहे. केस लांब आणि विस्कटलेले आहेत. चेहरा अस्वच्छ दिसत आहे. दातही काळे आणि अस्वच्छ आहेत. त्याचा अवतार हा एखाद्या वेडसर व्यक्तीसारखा दिसत आहे.

‘तारे जमीन पर’ या चित्रपटात ईशान अवस्थीची व्यक्तिरेखा साकारणारा  दर्शिल सफारीसोबत तब्बल 16 वर्षानंतर आमिर खान स्क्रिन शेअर करणार आहे.आता दर्शीलनं सोशल मीडियावर आमिरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आमिर खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. दर्शीलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिर हा हातात धगधगती मशाल घेऊन उभा राहिलेला दिसत आहे. आमिरच्या फोटोला दर्शीलनं कॅप्शन दिलं, “हे आमिर खानचे मल्टीयूनिवर्स आहे. आम्ही सर्व त्यात जगत आहोत. अजून 3 दिवस बाकी…”

आमिरचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो वाढलेले केस आणि हातात दगड अशा लूकमध्ये दिसत आहे. दर्शील सफारीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील फोटो आणि सध्याच्या प्रोजेक्ट्सचा फोटो शेअर केला होता. या फोटोला दर्शीलनं कॅप्शन दिलं, ‘बूम…. 16 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आहोत, भावनिक वाटत आहे? हो, थोडेसे. लवकरच एक मोठी गोष्ट रिव्हिल होणार आहे”

आमिर खाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली होती. तो म्हणाला होता, “मी याबद्दल कधी जाहीरपणे बोललो नाही. आताही मी जास्त बोलू शकणार नाही. पण चित्रपटाचे फक्त टायटल सांगतो. सितारे जमीन पर असे या चित्रपटाचे नाव आहे. तुम्हाला माझा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आठवला असेल आणि या चित्रपटाचे नाव सितारे जमीन पर आहे कारण त्याच थीमवर हा चित्रपट आहे. तारे जमीन पर हा भावनिक चित्रपट होता. हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. हा चित्रपट तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल.  हा चित्रपट ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल नसणार असेही स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचा:

काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचा आणखीन एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

कसोटीपूर्वी ‘हा’ भारतीय गोलंदाज होणार क्रिकेटमधून मुक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss