Friday, May 3, 2024

Latest Posts

प्रेग्नेंसी नंतर Alia Bhatt घेतेय ‘ही’ थेरपी

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही आजकाल तिच्या कामामुळे आणि तिच्या मुलीमुळे फारच चर्चेत आहे . २०२२ एप्रिल मध्ये रणबीर कपूरशी लग्न केल्यानंतर दोन महिन्याने तिने गरोदर असल्याची बातमी दिली होती. नोव्हेंबर मध्ये ती आई झालीं. गरोदरपणात अनेक महिला पोस्टपार्टम डिप्रेशन चा सामना करतात त्यामध्ये अभिनेत्रींचा देखील समावेश असतो .त्यांना सुद्धा यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. आलिया भट ने देखील या सर्व गोष्टींचा सामना केला तिला डिप्रेशनला सामोरे जावे लागले . त्यासाठी आजही ती थेरपी घेत आहे असा खुलासा तिने केला आहे .

राहाच्या जन्मानंतर च्या मुलाखतीत तिने स्पष्ट केले होते ,” लोक काय म्हणतील ह्याचा मी नेहमीच विचार केला .मी सर्व नीट करतेय ना माझ्या आनंदासाठी चांगल सांगत आहेत असे विचार येतो . आपण बरेचदा आपल्याबद्दल संकोच वाटून घेतो . मी अजूनही माझ्या शाररिक स्वास्थ्यावरती काम करतेय .त्यासाठी थेरपी घेतेय जेथे मला माझ्या मनातील गोष्टी आणि भीती मांडता येते. थेरपीमुळे मला समजला की आई होणं हे मला पाचव्या किंवा दहाव्या दिवशी मला कळेल. हि चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे यासाठी मला नेहमी नवीन जबाबदारीसाठी सक्षम असणे गरजेचे आहे .

या प्रश्नांची कोणाकडेच सगळी उत्तर नसतात ” प्रेग्नंनसी नंतरच्या बॉडी इमेज इस्शु वरती बोलतांना आलिया म्हणाली , ”या थेरपी कडे मी वेगळ्या नजरेने बघते ,त्यामुळें आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी आणि आपले स्वास्थ्य कसे चांगले राहील याकडे मी लक्ष केंद्रित करते खर तर लोकडाउन पासूनच मी हे सुरु केलं होत .हीच खरी वेळ आहे स्वतःच्या आरोग्यवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी . वजनाबाबतीत मी नेहमीच जागरूक असायचे कारण मला माहितेय मला नेहमी कॅमेरासमोर उभ राहायचं आहे ” यामुळे मी नेहमीच फिट अँड फाईन राह्यनाचा प्रयन्त करत करायची. आलिया ला पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

आलिया भट आता स्वतः निर्मित केलेला ‘जिगरा ‘ ह्या चित्रपटात दिसणार आहे. त्या शिवाय रणबीर कपूर आणि विकी कौशल सोबत ‘लोवर अँड वॉर ‘ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करणार आहे. त्याप्रमाणे अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्रच्या यशानंतर आता लवकरच ‘ ब्रम्हास्त्र २’च चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे .

 

हे ही वाचा:

कच्च्या कैरीपासून बनवलेला ‘हा’ पदार्थ नक्की ट्राय करा

पैंजण आणि जोडव्यांचे महत्त्व आहे तरी काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss