Friday, May 3, 2024

Latest Posts

कच्च्या कैरीपासून बनवलेला ‘हा’ पदार्थ नक्की ट्राय करा

सध्या आंब्यांचा सिजन सुरु झाला आहे. कैरी म्हटली तर लगेच तोंडाला पाणी सुटतं. कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. कैरीपासून बनवलेले पदार्थ आंबट, गोड असतात. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत खायला खूप आवडतात. पण कधी घरच्या घरी कैरीपासून जेली बनवली आहे का? ही जेली फारकाळ टिकून राहते. त्यापासून आपल्या शरीराला विटामीन “सी” मिळते. चला तर जाणून घेऊयात रेसिपी.

साहित्य

  • कैरी
  • साखर
  • पुदिन्याची पानं
  • मीठ
  • काळ मीठ
  • मिरे पूड
  • जिरा पावडर

कृती

सर्वप्रथम कैरीला स्वच्छ धुऊन घ्या. त्यांनतर त्याचे साल काढून घ्या. कैरीचे बारीक तुकडे करा. पुदिन्याची पाने काढून घ्या. त्यांनतर एका मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाकून थोडे पाणी टाका. बारीक गुळगुळीत पेस्ट करून घ्या. मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्या. आता त्यात एक वाटी साखर घाला. साखरेचा कमी जास्त आवडीने समावेश करावा. त्यानंतर त्यामध्ये मीठ, काळ मीठ, जिरे पूड घालून सर्व एकत्र मिश्रण करून घ्या. हा मिश्रण एकत्र करण्यासाठी कढई गॅसवर ठेवा. ते मिश्रण त्यामध्ये टाका. सतत मंद आचेवर ढवळत राहा. हळूहळू मिश्रण घट्ट होईल. रंग येण्यासाठी त्यामध्ये हिरवा रंग घाला. छान घट्ट झाल्यावर एका ताटाला थोडं तेल लावून तेल पसरवून घ्या. नंतर त्यामध्ये ते मिश्रण टाकून समान पसरवून घ्या. हे मिश्रण सुकण्यासाठी रात्रभर फॅन खाली ठेवा. आता हे मिश्रण सुकलं की ताटाच्या कडेकडेने चाकूने थोडं सैल करून घ्या व ताटाला उलटा करून घ्या. आता जेलीचा बेस तयार झाला. नंतर चाकूने तुम्हाला हवे तसे आकार पाडा. एका भांड्यामध्ये साखर बारीक करा आणि त्यामध्ये काळ मीठ टाका. तयार केलेली जेली त्या साखरेत घोळवून घ्या. तयार आहे कैरीची जेली.

हे ही वाचा:

‘या’ खेळाडूने जिंकली भारताची लढत, १७ वर्षांत केली कामगिरी

महाराष्ट्रातील काही ठिकाणांना उष्णतेपासून दिलासा तर ठाण्याला Yellow Alert

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss