Saturday, May 4, 2024

Latest Posts

पैंजण आणि जोडव्यांचे महत्त्व आहे तरी काय?

लग्नानंतर मुलींच्या आयुष्यातल्या काही गोष्टी बदलून जातात. छोटे मोठे बदल होणे हे चालूच असते. अंगाला हळद लागल्यावर तीचं सौंदर्य बदलून जाते. लग्नानंतर मंगळसूत्र, जोडवी, हातात बांगड्या, नाकात नथ, पायात पैंजण, कपाळाला टिकली लावून सर्व श्रृंगार करून नवरी तयार असते. पण पायात जोडवी आणि पैंजण घालण्याचं काय कारण आहे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊयात या मागचे कारण.

पैंजण घालण्याचे फायदे आणि महत्व

लग्नात आणि लग्नानंतर नववधू पैंजण घालते. पैंजण हा एक महत्त्वाचा अलंकार आहे. पैंजणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. शरीराला वाईट नजरेपासून पैंजण बचाव करते. ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्राशी मानला आहे. चंद्र मनाला नियंत्रित ठेवण्यात मदत करतो. पैंजणाच्या घुंगराने नकारात्मकता दूर करते. पायाला रक्त पुरवठा पण चांगला होतो. ज्या महिला पायात पैंजण घालतात, त्यांना सूज येणे यांसारखे त्रास होत नाहीत. याबरोबर शरीराला थंडावा पण चांदी देत असते.

जोडवी घालण्याचे फायदे आणि महत्त्व

लग्नात जोडवी घातली जातात. जोडवी हा महत्त्वाचा दागिना मानला जातो. यामुळे स्नायू मजबूत राहतात. पायाच्या बोटात ही जोडवी घातली जातात. जोडवीचा दाब बोटांवर पडतो आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते.

हे ही वाचा:

Taarak Mehta सोडण्याबाबत ‘टप्पू’ ने केला मोठा खुलासा, लवकरच येणार Bigg Boss मध्ये

‘या’ फळाचं लोणचं तुम्ही कधी ट्राय केलंय का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss