Saturday, May 4, 2024

Latest Posts

RR vs MI, मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सकडून सलग दुसऱ्यांदा पराभव

सध्या आयपीएलचे वारे सर्वत्र वाहत आहे. आणि मुंबई इंडियन्सला यावर्षीच्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागत आहे. प्रथम मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आणि आता जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडीयममध्ये मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली.

सध्या आयपीएलचे वारे सर्वत्र वाहत आहे आणि मुंबई इंडियन्सला यावर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स कडून सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे. प्रथम मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आणि आता जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडीयममध्ये मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली. राजस्थानने मुंबईवर ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या पराभवामुळे हार्दिक पांड्या निराश झाल्याचं दिसून आलं. हार्दिकने पराभवचे कारण त्यांची टीम असल्याचं सांगितलं. खेळाडूंनी बॅटिंगचा शेवट नीट न केल्याने १०- १५ धाव कमी पडल्या. तसेच बॉलिंगही वायफळ ठरली. मुंबईचा हा आठवा सामन्यातील पाचवा पराभव होता. कप्तान म्हणून हार्दिक पांड्यालाच अपयशी ठरवले गेले. पांड्याने १०० च्या स्ट्राईक रेटने १० बॉल मध्ये १० धाव केल्या होत्या. पांड्या फिनिशर म्हणून आलेला मात्र त्याला एवढी चांगली कामगिरी करता नाही आली. त्याने २ ओव्हर फेकल्या आणि २ ओव्हर मध्ये त्याने २१ धाव दिल्या. त्याला काही विकेट घेता आली नाही.

पराभवानंतर पांड्या म्हणाला, ‘समस्या सुरवातीपासूनच झाल्या होत्या. तिलक आणि नेहा या दोघांनीही चांगली फलंदाजी केली. २ विकेट्स गमावल्यानंतर १८० धावपर्यंत पोहोचू असा वाटलंच नव्हतं. बॅटिंगचा शेवट अपेक्षित करू न शकल्याने १०- १५ धाव कमी पडल्या. स्टॅम्पवर बॅटिंग करायची होती पण पॉवरप्ले मध्ये आम्ही कमी पडलो. फिल्डिंगसाठीही हा दिवस चांगला नव्हता. एकूणच निर्णय घेण्यात चुकल्याने चांगला खेळ जमवून घेता नाही आला. सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत. आपापल्या भूमिकेबद्दल त्यांना जाण आहे. ज्या चुका घडल्या त्या सुधाराव्या लागतील. चुका स्वीकारून त्यावर मेहनत घ्यावी लागेल’.

राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियाग पराग, ध्रुव जरेल, युझवेंद्र चहल, आवेश खान, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, रोवमान पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट हे प्लेयिंग इलेव्हन असून मुंबई इंडियन्स कडून, हार्दिक पांड्या, ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,टीम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, मोहम्मद नबी, नेहा वढेरा व जेराल्ड कोएत्झी हे प्लेयिंग इलेव्हन होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss