Saturday, May 4, 2024

Latest Posts

परिवारासाठी घेतला Chinmay Mandlekar ने मोठा निर्णय

अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या चांगलाच वादात अडकला आहे. वयक्तिक जीवनातील काही कारणामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. चिन्मयच्या मुलाचे नाव जहांगीर असे आहे. मागे चिन्मयची बायको नेहा मांडलेकर हिने व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सला चांगलाच खडसावलं देखील होत.

अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या चांगलाच वादात अडकला आहे. वैयक्तिक जीवनातील काही कारणामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. चिन्मयच्या मुलाचे नाव जहांगीर असे आहे. मागे चिन्मयची बायको नेहा मांडलेकर हिने व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सला चांगलाच खडसावलं देखील होतं. याचबरोबर लोकांनी चिन्मयला पाकिस्तान अफगाणिस्तानला ही जाण्यास सांगितलं होत. नेहाने यावर प्रतिक्रिया देत ट्रोलर्सला चोख उत्तरही दिल होतं. पण यानंतर ही ट्रोलर्स थांबले नाही. म्हणून नेहानंतर आता चिन्मयनेही त्याच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचेही सांगितले आहे. मागील बऱ्याच चित्रपटांमध्ये चिन्मयने महाराजांची भूमिका साकारली होती. ज्यामुळे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला. म्हणून चिन्मयने इथून पुढे महाराजांची भूमिका न साकारण्याचे ठरवले आहे.

व्हिडीओमध्ये चिन्मय म्हणाला ‘हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर कमेंट्स कमी झाल्या नाहीत तर त्या अजून वाढल्या आहेत. लोक माझ्या पितृत्वापासून त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत बोलत आहेत. एक व्यक्ती म्हणून मला त्रास होतोय. मी एक अभिनेता आहे, पण माझ्या कुटुंबाला सोशल मेडियावरून जर कुठल्याही पद्धतीचा त्रास होत असेल तर त्याला मी बांधील नाही. माझ्या कामावरून तुम्हाला मला वाटेल ते बोलायचं असलं तर बोला. आवडलं नाही आवडलं ते प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियाद्वारे कळवू शकता. पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला नाही. मा‍झ्या मुलाचं नाव मी ‘जहांगीर’ का ठेवलं हे मी आजवर अनेक माध्यमातून बोललो आहे. तुम्ही जाऊन ते पाहू शकता. मा‍झ्या मुलाचा जन्म २०१३ साली झालाय तेव्हा ही ट्रोलिंग झाली नाही आता होतीये. मला महाराजांच्या भूमिकेनं खूप काही दिल. पण मी करत असलेल्या भूमिकेमुळे जर मा‍झ्या कुटुंबाला त्रास होत असेल तर एक कुटुंब प्रमुख म्हणून मला कुटुंब जपान अधिक महत्त्वाचं आहे. मी केलेल्या भूमिकेमुळे मा‍झ्या ११ वर्षाच्या मुलाला जर समोर जावं लागत असेल तर माफी मागून मी सर्वांसमोर हे जाहीर करू इच्छितो की, इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही’ असा म्हणत चिन्मयने एक मोठा निर्णय घोषित केला.

हे ही वाचा:

मुंबईतील भाजप कार्यालयाला शॉट सर्किट होऊन आग

उद्धव ठाकरेंचा Amit Shah आणि PM Modi यांच्यावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss