Tuesday, May 14, 2024

Latest Posts

नवविवाहित जोडप्याचे पारंपरिक अंदाज,मुग्धा- प्रथमेशचं  after wedding shoot व्हायरल

मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे काही महिन्यांपूर्वीचं लग्न बंधनात अडकले आहेत.

मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे काही महिन्यांपूर्वीचं लग्न बंधनात अडकले आहेत.सारेगमप लिटील चॅम्प पासून सुरु झालेला हा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहचला आहे.सध्या ही जोडी वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे प्री-वेडिंगशूटचा ट्रेंड सुरु आहे.हे प्री-वेडिंगशूट लग्नाच्या आधी केले जाते,मात्र, मुग्धा आणि प्रथमेशने हा ट्रेंड मोडीत काढत चक्क आफ्टर वेडिंगशूट केलं आहे. त्यांच्या हा नवा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे.

मुग्धा आणि प्रथमेश सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात.त्यांचा दोघांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.नुकताच या दोघांनी सोशल मीडियावर आपला आफ्टर वेडिंगशूट शेअर केलं आहे.यामध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.. विशेष म्हणजे कायम संस्कृतीचं भान जपणाऱ्या या जोडीने या व्हिडीओशूटच्यावेळीदेखील पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे. मराठमोळी काटपदराची साडी नेसुन आणि प्रथमेशने धोती- पायजमा असा पारंपरिक लूक करुन फोटोशूट केलं आहे.

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मुग्धा आणि प्रथमेशने थंड हवेशीर  समुद्र किनाऱ्यावर सुरेख असं व्हिडीओशूट केलं आहे.कोणातही बडेजावपणा न करता अत्यंत साध्या लूकमध्ये या जोडीने हा व्हिडीओशूट केल्यामुळे नेटकरी त्यांच्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून  लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहे. तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे जेथे ती प्रथमेशसोबतच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.सध्या ही दोघ लग्न एन्जॉय करताना दिसून येत आहेत.दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश ही दोघ सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.चाहते देखील त्यांच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंंट्स करत पसंती दर्शवतात.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil खरंच शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतायत का? | Sharad Pawar | Maratha Reservation

अजय देवगणच्या आगामी ‘शैतान’ चित्रपटाचा अंगावर शहारे उमटवणारा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss