Thursday, May 9, 2024

Latest Posts

Taarak Mehta Ka Ooltah Chashmahचा सोढी गेला तरी कुठे? घरच्यांच्या चिंतेत वाढ

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील कलाकार ‘रोशन सिंह सोढी’ म्हणजेच गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण सिंह २२ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान दिल्लीहुन मुंबईला घरी येण्यासाठी निघाले. ते दिल्ली विमानतळावर आले परंतु, विमानात बसलेच नाही आणि घरी पण गेले नाही. विमानात बसण्याआधी त्यांनी ‘मी विमानात बसत आहे’ असे घरी सांगितले. आता गुरुचरण सिंह कुठे गेले हा प्रश्न पडला आहे.

दिल्ली पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा शोध सुरु केला आहे. वृद्ध आई-वडील गुरुचरण सिंहचा शोध घेत आहेत. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे निर्माते जेडी मजीठिया यांना गुरुचरण यांच्या बेपत्ता झाल्याची माहिती कळाल्यानांतर लगेच त्यांनी त्यांच्या मित्रांना माहिती कळवली. जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी यांना पण लगेच माहिती कळवण्यात आली. गुरुचरण सिंग यांचा २४ एप्रिल पासून फोन बंद आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती पण ठीक नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पोलीस सध्या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. बँक खात्यातील काही व्यवहार हे जरा संशयास्पद आहेत असे पोलिसांना वाटत आहे. अपहरण झाले आहे की काही घटना घडली आहे. याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील सोढीची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. २०१३ मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. पण काही वर्षांनी त्यांनी परत कमबॅक केला. २०२१ मध्ये पुन्हा त्यांनी शो सोडला. एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली आणि खाजगी आयुष्यात पण अडचणी होत्या. त्यामुळे हा शो सोडल्याच सांगितलं होत.

हे ही वाचा:

Shruti Haasanने केला नात्याचा खुलासा

नाश्तासाठी शेवयाचा उपमा नक्की ट्राय करा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss