Monday, May 20, 2024

Latest Posts

इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या काठावर 700 वर्षे जुनी गणेशाची मूर्ती?

गणेशाची मूर्ती आणि तिही इंडोनेशियात? वाचून आश्चर्य वाटलं ना? पण, हे खरंय

देशभरात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे. ठिकठिकाणी विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत करता यावे म्हणून सगळीकडेच लगबग सुरु आहे. त्यात यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे किंवा काहीशे शिथिल असल्यामुळे लोकांच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावर उरलेला नाही. गणेशोत्सव दरम्यान देशातील जवळपास सर्वच गणेश मंदिरे सजवली जातात आणि लोक आपला बराचसा वेळ गणपतीची पूजा, आरती करण्यात व्यतीत करतात. वेगवेगळ्या गणेश मंडळांमध्ये मूर्ती बसवल्याजातात, तर प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी नेहमीपेक्षा वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की केवळ भारतातच नाही तर इंडोनेशियामध्येही अनेक गणेश मंदिरे आहेत आणि इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या तोंडावर 700 वर्षांपासून गणेशाची एक मूर्ती आहे?

गणेशाची मूर्ती आणि तिही इंडोनेशियात? वाचून आश्चर्य वाटलं ना? पण, हे खरंय.

इंडोनेशियातील 141 ज्वालामुखीपैकी 130 अजूनही सक्रिय आहेत आणि त्यापैकी एक माउंट ब्रोमो आहे. हे पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात आहे. इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखी ब्रोमो पर्वतावरील गणपतीच्या मूर्तीबद्दल सांगितली जाणारी कथा एक लोककथा असली तरी ही मूर्ती 700 वर्षांपासून तिथे आहे असे तेथील स्थानिक लोकांचे मत आहे.

येथे असलेल्या गणेशमूर्तीमध्ये विशेष काय आहे?

ब्रोमो म्हणजे जावानीज भाषेत ब्रह्मा, पण या ज्वालामुखीमध्ये गणेशाला विशेष स्थान आहे. ज्वालामुखीच्या मुखाशी असलेली मूर्ती येथील लोकांचे रक्षण करते अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या आहे आणि येथे मंदिरांची कमतरता नाही. गणेश मंदिरापासून शिवमंदिरापर्यंत अनेक देव आणि त्यांची मंदिरे इथे पाहायला मिळतील.

जावा प्रांतात जावानी लोक राहतात. त्यांच्या पूर्वजांनी ही मूर्ती बसवली अशी त्यांची श्रद्धा आहे. गणपतीची पूजा इथे कधीच थांबत नाही. इथे स्फोट झाला तरी तरी ही पूजा अशीच सुरु राहील असे म्हटले जाते. वास्तविक, ही एक परंपरा आहे, ‘यादनाया कसाडा’ नावाची ही परंपरा वर्षातील एका खास दिवशी साजरी केली जाते. हा 15 दिवसांचा उत्सव आहे जो या मूर्तीच्या स्थापनेपासून सुरू आहे.

वरील गणेशमूर्तीच्या उत्सवासह पूजेबरोबरच बकऱ्यांचा बळी देखील दिला जातो आणि नैवेद्य म्हणून फळे, फुले इ. असे न केल्यास, ही परंपरा न पाळल्यास ज्वालामुखीचा उद्रेक येथील लोकांना खाऊन टाकेल, असे मानले जाते.

हे ही वाचा:

संभाजी ब्रिगेड संस्था कुणी स्थापन केली? आणि त्याचा इतिहास काय?

या गणेशचतुर्थीत भेट द्या मुंबईतील या 5 प्रसिद्ध गणेश मूर्तींना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss