Wednesday, May 1, 2024

Latest Posts

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध मंदिरांमध्ये सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) हे खूप लोकप्रिय आहे.

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध मंदिरांमध्ये सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) हे खूप लोकप्रिय आहे. या गणपती बाप्पाची सोंड उजवीकडे आहे. ती सिद्धपीठाशी संबंधित आहे त्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक मंदिर म्हणतात. जगाच्या कान्याकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रामध्ये या गणपतीचे मोठ्या प्रमाणावर भक्त आहेत. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रभादेवी परिसरात आहे. या मंदिरात प्रत्येक जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला वळलेली सोंड आहे.त्यामुळे हे मंदिरही एक सिद्धपीठ आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे आधीच्या काळी खूप छोटे होते. घुमटाकार रचना असलेल्या या मंदिराचे बांधकाम आधी विटांचे होते. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. १९ नोव्हेंबर १८०१ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मंदिरासाठी लागणार खर्च एका महिलेने दिला होता. या महिलेला मुलं नसल्यामुळे तिने गणपती मंदिराला सढळ हस्ते मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा, अशी तिची इच्छा होती. सिद्धिविनायकाची मूर्ती ही पाषाणाची आहे. या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे. या मंदिरात पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह गणपती विराजमान झाले आहेत. मंदिरातील मूर्तीचे स्वरूप अत्यंत मनमोहक, प्रसन्नता देणारे आणि मनःशांतीदायक आहे. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली आहेत. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो.

मुंबईतील सगळ्यात श्रीमंत मंदिरांमध्ये सिद्धिविनायक मंदिर देवस्थान आहे. या मंदिराला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान केले जाते. तसेच अनेक वस्तू देखील दान केल्या जातात. या मंदिराकडून अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी कामे केली जातात. अनेकांना आर्थिक मदत केली जाते. राज्याच्या संकटकाळी सिद्धिविनायक सामान्यांच्या मदतीला धावून जाते. नसला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणार म्हणून या गणपतीची ओळख आहे. बाप्पाच्या दर्शनानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे आहेत.

हे ही वाचा: 

अभिनेत्री वनिता खरातने शेअर केले खास फोटो

गणपतीसाठी बनवा खास चणा डाळीचे मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss