Wednesday, May 1, 2024

Latest Posts

होऊ दे धिंगाणा म्हणत पुण्यात मराठी कलाकारांच्या ढोलताशा पथकाचा गजर

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक मोठया दिमाखात पार पडते.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक मोठया दिमाखात पार पडते. दरवर्षी प्रमाणे मराठी कलावंतांचा ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तेजस्विनी पंडित , सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे ,आस्ताद काळे, दिप्ती देवी, सौरभ गोखलेसह अनेक कलाकार ढोल वादनात सहभागी झाले आहेत .

सिद्धार्थ जाधव यांनी माध्यमांशी बोलताना आपलया भावना व्यक्त केल्या आहेत ,”गेल्या दहा वर्षांपासून कलावंत ढोल ताशा पथक सुरू आहेत. आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होताना एक वेगळाच आनंद मिळतो. संगीतात एक वेगळी एनर्जी असते. प्रामाणिकपणे दीड महिना प्रॅक्टिस करून ढोल वादन करण्यात एक वेगळीच मजा आहे” असं त्यांनी म्हंटल आहे. ढोलताशांचा लहानपणी मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सहभागी होत असे.

सिद्धार्थ जाधव यांनी मराठी सिनेमानं बाप्पाच्या आशीर्वादाने चांगले दिवस येत आहेत चांगल्या कलाकृती मिळत आहेत असं म्हंटल आहे. मराठी सिनेमांना प्रेक्षक जात आहेत. ही एक आनंददायी बाब आहे. त्याचा आनंद आज साजरा करत आहे. सिने कलावंत व ढोल ताशा पथकाचं यंदाचं दहावं वर्ष आहे. त्यामुळे दुप्पट एनर्जी मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या आता होऊ दे धिंगाणा”. अशा गजरात गणरायाला निरोप दिला जात आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हेने सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ,”मला असं वाटतं की, पुण्यातील बाप्पाची मिरवणूक ही कायमच खूप गाजणारी असते. गणरायाच्या नावाने जे गजर करतात त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची आणि कौतुकाची बाब असते.आमच्या कलावंत ढोल ताशा पथकाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या १४ वर्षांपासून मी ढोल वादन करत आहे. पण कलावंत ढोल पथकात मला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत” अशा
आपल्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

कलाकारांनी बाप्पाच्या मिरवणुकीत बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर केला आहे. ढोल-ताशांचा गजर करतानाचे मराठी कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कलावंत आणि मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथक दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात पुण्यातील बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली असून आता ढोल ताशांच्या गजरात कलाकार बाप्पाला निरोप देणार आहेत. त्याचप्रमाणे मंडई पासून ते अलका चौका पर्यंत मोठं मोठ्या रांगोळ्या देखील पाहायला मिळाले आहेत.

हे ही वाचा: 

मुंबईकर आज बाप्पाला देणार निरोप , बीएमसीने बनवले २०० कृत्रिम तलाव तर सुरक्षेसाठी १९ हजार पोलीस तैनात

संभाजीनगरने दिला एकतेचा संदेश, गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी तर ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक…

Lalbaugcha Raja Visarjan 2023, १० दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी होणार मार्गस्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss