Wednesday, May 1, 2024

Latest Posts

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचा इतिहास घ्या जाणून

कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली.

कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. कसबा गणपती दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटा वजा मूर्ती. पुणे शहरात हे एकमेव मंदिर आहे ज्या गणपतीला हात व पाय नाही आहेत.

महाराज शहाजीराजे यांनी बेंगळुरूहून बालशिवराय आणि जिजाऊसाहेब यांना पुण्यात पाठविले. स्वराज्याचा श्री गणेशा पुण्यापासून करण्याचा निर्णाय घेण्यात आला. पुण्यात डौलदार लाल महाल उभा राहतानाच येथील भग्न मंदिर अन् वास्तूंचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच वेळी जिजाऊंनी कसबा गणेशाचे मंदिर बांधून, पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला गेला. कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे गणरायाची पूजा अर्चा आणि व्यवस्था देण्यात आली होती. १६४० ते १६४२ या कालावधीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातील कसबा पेठेत गणेशाचे मंदिर आहे. पुण्यात वास्तवाला असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी शिवछत्रपती कसबा गणेशाचे दर्शन घेत असत; म्हणून या गणरायाला ‘श्री जयती गणपती’ असे म्हंटले जाते होते. त्यानंतर पुढे १२ मावळांचा कारभार, स्वराज्यविस्तार, लाल महालावर छापा, पहिली राजधानी राजगड या सगळ्या घटना जयती गजाननाच्या साक्षीने घडत गेल्या. या गणरायाची मूर्ती स्वयंभू असून, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार मनात घर करून राहतो. मूर्तीचे डोळे हिऱ्यांचे आणि नाभी माणकाची आहे. प्राचीन पुण्याच्या वस्तीजवळच हे मंदिर आहे.

पुण्यातील कसबा मंदिराचा जीर्णोद्धार जिजाऊंनी केला होता. त्या शिवरायांसह पुण्यात आल्या होत्या. तेव्हा ही मूर्ती पडक्या भिंतीच्या आवारात होती. ही घटना १६४२ साला मधली आहे. गणपती संप्रदायाची स्थापना करणारे गणेशभक्त मोरया गोसावी यांचे मूळ नाव शाळिग्राम असे होते. या गणरायाला नवस केला होता.गणरायाची पूजाअर्चा आणि मंदिराच्या व्यवस्थेसाठी मोरेश्वर ठकार यांना शहाजीराजे आणि जिजाऊंची सनद आहे. पेशवाईतही मंदिराची उत्तम व्यवस्था राखण्यात आल्याचे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.

हे ही वाचा: 

महाजनांनी पुन्हा करुन दाखवलं, २१ व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे…

पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss