Monday, May 20, 2024

Latest Posts

घरगुती आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी सुंदर सजावट

वर्षभर ज्या सणाची वाट बघत असतो तो सण म्हणजे गणेशउत्सव, यंदा गणेशउत्सव ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशउत्सव हा थाटामाटात साजरा केला जातो,आणि काही खास गोष्टीची सजावट केली जाते. त्याचबरोबर सजावटी दरम्यान खास संदेश ही दिला जातो.सजावट करताना थर्माकोलचा वापर टाळावा, आणि पर्यावरणपूरक गणपतीबाप्पा साठी मकर सजावट केली करावी. त्यामुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होणार नाही. गणेशउत्सव अगदी पुढच्या आठवड्यात येत असल्याने लोकांकडे सजावटीसाठी फार कमी वेळ आहे. त्यामुळे लोक घरच्याघरी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून सजावट कारण पसंत करत आहे. ज्यामुळे पर्यावरणावर परिणाम होणार नाही.

हेही वाचा : 

क्रिमिनल जस्टिस ३ ; पंकज त्रिपाठीची वेब सिरीज लाँच पण, चाहत्यांनी संताप केला व्यक्त

फुलांची सजावट : फुलांची सजावट करताना आपण वेगवेगळे फुले वापरू शकतो आणि फुलांचं मकर ही बनवू शकतो फुलांचे तोरण वापरू शकतो. फुलांची सजावट करताना जास्वंदी फुले वापरू शकतो.ज्यानें करून सजावटी मध्ये काहीतरी नवीन वाटेल,आणि फुलांचा सजावटी पासून संदेश हे देऊशकतो.

टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे : टाकाऊ पुठयापासून गणपती बाप्पासाठी सिंहासन बनवणे. प्लास्टिक टोपली पासून झुंबर बनवणे.प्लास्टिक पासून वेणी ,गजरा वेगवेगळी फुले बनवणे. गणपतीबाप्पा चा सजावटी साठी आपण प्लास्टिकचा पानांचा वापर करू शकतो. जुन्या बांगडीपासून मस्त वॉलपीस बनवू शकतो.

आंब्यांची पाने : आंब्यांच्या पानांपासून तोरण बनवणे, तोरण बनवताना फुलांचा वापर ही करू शकतो. गणपतीसाठी भिंतींवर सजावटी साठी पानांचा वापर केला जातो. आंब्यांचा पानांचा उपयोग औषधीसाठी आणि पूजेदरम्यान केला जातो. आपल्या महाराष्ट्रा मध्ये आंब्यांचा पानांना खूप महत्व आहे. शुभकार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. घरामध्ये सकारत्मक वातावरण निर्माण होते.

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी, किरीट सोमय्या यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Latest Posts

Don't Miss