Monday, May 20, 2024

Latest Posts

यंदा गणेशोत्सवनिम्मित द्या हटके शुभेच्छा !!!

श्रावण महिना चालू झाला कि सर्वांना सणाचे वेध लागतात. एकापाठोपाठ एक सण सुरु होतात. यासर्वांमध्ये सर्व नागरिकांना सर्वांत जास्त ओढ असती ती गणेशोत्सव सणाची.

श्रावण महिना चालू झाला कि सर्वांना सणाचे वेध लागतात. एकापाठोपाठ एक सण सुरु होतात. यासर्वांमध्ये सर्व नागरिकांना सर्वांत जास्त ओढ असती ती गणेशोत्सव सणाची. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा सर्वांचे लाडके हे गणराय ३१ ऑगस्ट रोजी येणार आहे. परंतु आतापासूनच सर्वांची तयारी हि झाली आहे.

कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी यंदा मोठ्या थाटात हा सण साजरा केला जाणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे. या सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठवत असतात. म्हणूनच गणेशोत्सवनिम्मित छान छान संदेश पाठवून यांचा गणेशोत्सव सण साजरा करा.

“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली
माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

हे ही वाचा :- सर्वांच्या लाडक्या लालबागच्या राज्याची अनोखी कहाणी… 

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला,व तुमच्या कुटुंबियांना
हार्दिक शुभेच्छा!!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

गणेशाच्या उदराइतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान होवो
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

हे ही वाचा :-

या गणेशचतुर्थीत भेट द्या मुंबईतील या 5 प्रसिद्ध गणेश मूर्तींना

गणपती बाप्पा मोरया! म्हणायला भाग पडणारी काही हिंदी गाणी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss