Monday, May 20, 2024

Latest Posts

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अखेर आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचे विसर्जन हे झाले (Lalbaugcha Raja Visarjan 2022) आहे.

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अखेर आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचे विसर्जन हे झाले (Lalbaugcha Raja Visarjan 2022) आहे. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गिरगाव चौपाटीवर तुडुंब गर्दी हि केली. आणि आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या… ! म्हणत निरोप दिला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी हि पाहायला मिळाली. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा पार पडला.


दरवर्षी लालबागच्या राजाचं (Lalbaug Raja) दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) दाखल झाला. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja Visarjan) मूर्ती समुद्रात रवाना झाली. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला. आज सकाळी ९ : ०५ ला लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

कोविडच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. २३ तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झाली नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. मुंबईत लालाबागच्या राजासह मुंबईतील मोठ्या मंडळाचे बाप्पा हे विसर्जनासाठी गिरगांव चौपाटीवर पोहचले आहेत. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी मुंबईत भाविकांची गर्दी हि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबईत गणेश विसर्जनाचा उत्साह पहायला मिळत आहे. भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जात आहे. दादर, गिरगाव आदी चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडून घेतलं आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लाल बागच्या राजाला निरोप दिलाय.

 

हे ही वाचा:

संरक्षण क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी भारत एक पाऊल पुढे

हैदराबादमध्ये ब्रह्मास्त्रचा प्री-रिलीज इव्हेंट रद्द, कलाकारांनी चाहत्यांची मागितली माफी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss