Monday, May 20, 2024

Latest Posts

Eco Friendly Makhar, यंदा घरच्या घरी लाडक्या बाप्पासाठी बनवा इको फ्रेंडली मखर

आता गणपती (Ganeshotsav 2023) जवळ येत आहेत. तर प्रत्येक जण गणपतीला काय तयारी करायची या विचारात असेल.

आता गणपती (Ganeshotsav 2023) जवळ येत आहेत. तर प्रत्येक जण गणपतीला काय तयारी करायची या विचारात असेल. त्यात पर्यावरणाला कोणताही त्रास किंवा बाधा न आणता गणपती बापाच्या आगमनाला मखर बनवण्याचा विचार करत असाल तर, नक्कीच ही निसर्ग संवर्धनासाठी एक चांगली बाब आहे. यंदाच्या वर्षी काय ब्र डेकोरेशन करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.

यंदाच्या वर्षी तुम्ही गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली (Eco friendly) मखर बनवण्याचा विचार करत असाल, तर आधीपासूनच कामाला सुरुवात करा. नंतर खूप कमी वेळ हातात राहिलेला असतो. तेव्हा काहीतरी करण्याच्या नादाने एक हटके डेकोरेशन आपल्या गणपती बाप्पासाठी राहून जाते. सर्वात आधी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा की तुम्हाला कसं डेकोरेशन किंवा मखर बनवायचं आहे. आधी तुमच्या कल्पना कागदावर उतरवा. साधी सुधी का असेना एक आकृती स्वरूपात कल्पना कागदावर उतरवा. इको फ्रेंडली डेकोरेशन करताना तुम्हाला नक्कीच थर्माकोलचा (Thermocol) वापर करायचा नाही. थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर करून तयार केलेले मखर शोभुन दिसत नाही. एक नीट लक्षात असू द्या, डेकोरेशन हे टाकाऊ वस्तूपासून केले आहे हे वाटून देऊ नका म्हणून त्याला शेवटी फिनिशिंग टच द्या. तुम्हाला फिनिशिंग टच हा रंग पेटीतून किंवा पोस्टर कलर वापरून नीट रंगवता येईल. त्यासाठी कागद आणि पुठ्ठे याचा नीट वापर करता यायला हवा.

तुम्ही कला क्षेत्रात पारंगत नसाल तर, या क्षेत्रात ज्याची कला चांगली आहे त्या मित्रांची मदत घ्या. पुठ्याचं झाड आणि कागदाची पान केली, तर ती रंगवण्यासाठी छान वाटली पाहिजे. कागद दुमडून झोपडीचे कौल करता येईल. त्याला तपकिरी रंग हा कसा आणि किती देता घेईल ते तुम्ही समजून घ्या. बाहेरून लाईटस देताना शॉक किंवा शॉर्ट सर्किट होवून आग लागणार नाही याची काळजी घ्यावी. डेकोरेशन करताना कपड्याचा वापर करायचा असेल तर, खादी, सुतीच्या प्लेन किंवा काटपदराच्या साड्याचा वापर करावा.

गणपतीच्या मूर्तीची उंची किती ठेवण्यात येईल, कुठे कोणत्या रंगाचा कागद वापरता येईल, त्याला दुमडून डिजाइन कशी बनवता येईल आणि वेगवेगळे रंग वापरून शोभा कशी वाढवता येईल. साधारण मखर सजवताना ३ पेक्षा जास्त रंग वापरले नाही तर ते जास्त उठून दिसते. त्यात जास्त रंग वापरले तर ते बटबटीत दिसत. हे टाळण्यासाठी रंगाची योग्य रंगतसंगत वापरावी. याआधी आपल्याला कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत याची यादी बनवा. डेकोरेशनच काम सुरु असताना मध्येच बाजारात जाऊन सामान आणायला वेळ जास्त जातो आणि मखर किंवा डेकोरेशनला जास्त वेळ लागतो.

Latest Posts

Don't Miss