Monday, May 20, 2024

Latest Posts

लालबागच्या राजाचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची तुफान गर्दी

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. पुणे, मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात हि काल सकाळ पासून झाली होती.

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. पुणे, मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात हि काल सकाळ पासून झाली होती. मुंबईत लालाबागच्या राजासह मुंबईतील मोठ्या मंडळाचे बाप्पा हे विसर्जनासाठी गिरगांव चौपाटीवर पोहचले आहेत. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी मुंबईत भाविकांची गर्दी हि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

अवघ्या काही क्षणात लालबागच्या राजाचे हे विसर्जन होईल. बाप्पा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून बाप्पाची आरती हि झाली आहे आणि आता त्याला निरोप देण्याची वेळ हि जवळ आली आहे. मुंबई तब्बल २२ तासानंतर देखील विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे. थोड्याचवेळात विसर्जन होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली आहे. मुंबईत गणेश विसर्जनाचा उत्साह पहायला मिळत आहे. भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जात आहे. दादर, गिरगाव आदी चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

कोविडच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली होती.

दरवर्षी लालबागच्या राजाचं (Lalbaug Raja) दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. २३ तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झाली नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते.

तर दुसरीकडे पुण्यात दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. शिवाजी रस्त्यावरुन दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली आहे. रात्रभर मोठ्या उत्साहात गणेशभक्तांची मिरवणुकीत हजेरी दिसून आली आहे. दगडूशेठ गणपतीचंही थोड्याच वेळात विसर्जन पार पडणार.

 

हे ही वाचा:

ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

माझगावच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ सहकुटुंब सहभागी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss