Monday, May 20, 2024

Latest Posts

Maghi Ganesh Jayanti 2023, या शुभ मुहूर्तावर करा बाप्पाची पूजा विधी

उद्या दि २५ जानेवारी पासून माघी गणेशोत्सवला सुरवात होणार आहे. या दिवसाला माघी गणेश जयंती अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती असे देखील म्हणतात.

Maghi Ganesh Jayanti 2023 : उद्या दि २५ जानेवारी पासून माघी गणेशोत्सवला सुरवात होणार आहे. या दिवसाला माघी गणेश जयंती अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती असे देखील म्हणतात. याच दिवशी विनायक चतुर्थी पण आहे. गणपतीचे एकूण तीन अवतार समजले जातात. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा करतात. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करतात. सर्वांचा पूजनीय आणि लाडका गणपती बाप्पा यास विघ्नहर्ता, गणेश, बुद्धीदाता, एकदंत, गणेशाय, गणाध्यक्षाय असे अनेक नावे आहेत. तसेच माघी गणेश जयंतीला मातीच्या अथवा धातूच्या गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. म्हणूनच आज आपण माघी गणेश जयंतीनिम्मित पूजाविधी, मुहूर्त, शुभ योग सर्व काही सविस्तर जाणून घेऊया.

माघी गणेश जयंती पूजा विधी, महत्व आणि मान्यता –

माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करण्याची प्रथा असते. सर्वात आधी बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक केली जाते . चौरंगावर बाप्पाची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. नंतर जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा बाप्पाला अर्पण करावीत. आणि गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

माघी गणेश जयंती प्रारंभ आणि समाप्ती –

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल.

मुहूर्त आणि शुभ योग –

गणेश जयंती पूजा मुहूर्त – सकाळी ११ वाजून ३४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे.

शुभ योग – बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत बुधवारी गणेश जयंती असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. यंदा गणेश जयंतीला रवियोग असून, त्यानंतर शिवयोग सुरू होईल. रवियोगात गणपतीची पूजा केल्याने कामातील अडथळे दूर होतील.

हे ही वाचा:

गणपतीला दुर्वा का वाहावी ? माहित नसे तर नक्की वाचा

गणेशोत्सवानिम्मित जाणून घेऊया गणपतीपुळेचा इतिहास

जाणुन घ्या… ‘सुखकर्ता दुखहर्ता’ आरतीचा अर्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss