Monday, May 20, 2024

Latest Posts

यंदाच्या गणेशोत्सवाच्या नेमक्या मागण्यांबाबत शिफारसी कोणत्या?

गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहोत. . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली.

गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहोत. . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करण्यात आली आणि विविध मागण्यांबाबत विचारणा करण्यात येऊन प्रस्ताव ठेवण्यात आला. या संदर्भात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती प्रशासनासोबत चर्चा करणार आहे.

यंदाच्या वर्षीच नव्हे तर खूप काळापासून गणपती मूर्तीच्या उंचीचा(Height) नियम शिथिल करावा.अशी मागणी केली जात आहे. तसेच ध्वनी प्रदुषणाबाबत(Noise Pollution) जे खटले भरवण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत.त्याचबरोबर तीन दिवसांऐवजी चार दिवस रात्री बारापर्यंत स्पीकरसाठी(Speaker) परवानगी द्यावी आणि रात्री बारा वाजल्यानंतर पारंपारिक वाद्य(Traditional Instrument) वाजवण्यासाठी परवानगी द्यावी. तसेच महत्वाचे म्हणजे बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे. यंदाच्या महागाईचा अंदाज बघता गणेशोत्सव काळात वस्तूंचे भाव(Price) नियंत्रणात ठेवावे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या ऑनलाईन(Online) मिळाव्या.या आणि अशा सर्व मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासन आणि इतर प्रशासनाबरोबर २६ जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मुंबई पालिका प्रशासनासमोर या मागण्या ठेवण्यात येणार आहेत.

तर पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा देखील यावरशोई सरकरने दिला आहे. गणेशमंडळांना पीओपीच्या(POP) नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून(Maharashtra Pollution Control Board) अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंच मुर्तींसाठी शाडूची माती(Shadu soil) बंधनकारक असणार आहे.गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दादा भुसे आदित्य ठाकरे यांना म्हणाले की …

“हे” म्हणाले मणिपूरमध्ये अफवांमुळे हिंसाचार वाढला

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झाले असे, कोसळली दरड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss