Saturday, May 18, 2024

Latest Posts

धनलाभासाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुळशीचे काही उपाय

अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्माचा सण आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्व आहे. दरवर्षी वैशाख महिन्यामधील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते.

अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्माचा सण आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्व आहे. दरवर्षी वैशाख महिन्यामधील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते त्यातील एक म्हणजे आखा तीज. अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा अंत नाही. याच कारणांमुळे अक्षय्य या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा अंत नाही. याच कारणांमुळे अक्षय्य तृतीया हा समृद्धी, आशीर्वाद, आनंद आणि यशाचा सण मानला जातो.

या दिवशी जो दानधर्म करतो आणि विष्णूची पूजा केली जाते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूसोबत तुळशीच्या रोपाची पूजा करण्याचाही विशेष विधी आहे. या दिवशी तुळशीच्या रोपांचे काही सोपे उपाय करून पाहिल्यास सदैव समृद्धी राहते, अशी ज्योतिषशास्त्रामध्ये श्रद्धा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूला पिवळ्या फुलांसह तुळशीची काही पाने अर्पण केल्यास तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येईल आणि आर्थिक स्थितीही चांगली राहते. तुळशीला भगवान विष्णूची लाडकी मनाली जाते आणि ज्या घरामध्ये तुळशीचे रोप लावले जाते त्या घरांमध्ये देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा विष्णूजींचा दिवस मानला जातो. तुळशीला अर्पण केल्याने विष्णू प्रसन्न होतात.

तुळशीची नियमित पूजा करण्याचा सल्ला दिला जात असला तरी अक्षय्य तृतीयेचा तुळशीपूजेसाठी सर्वात्तम मानला जातो. या दिवशी तुळशीची पूजा केली जाते त्यामुळे जीवनामध्ये कधीही अडचणी येत नाहीत. तुळशीची पूजा करण्यासाठी प्रथम तुळशीला पाणी अर्पण करावे तिच्या पानांवर सिंदूर लावून सात वेळा प्रदक्षिणा करावी. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीची आरती करून दिवा लावला तर ते तुमच्यासाठी शुभ राहील. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरातील तुळशीच्या भांड्यावर स्वस्तिक चिन्ह बनवून त्याची पूजा करावी.

हे ही वाचा : 

पुण्यामध्ये गारायुक्त पावसाला सुरूवात, पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा

आमच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना लावली आहे, संजय राऊत

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss