Friday, May 17, 2024

Latest Posts

रोजच्या जेवताना एका तरी डाळीचा समावेश असावा, डायबिटीज व हार्ट अटॅकचा धोका उद्भवणार नाही

रोजच्या जीवनात डाळ ही अनेक भारतीयांच्या आहारातला एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना ही गोष्ट माहित नाही पण डाळीचा समावेश हा आहारात असायलाच हवा कारण आपल्या निरोगी आरोग्यासाठी डाळ महत्त्वाची आहे. तशा तर डाळी अनेक प्रकारच्या असतात उदा, चणा डाळ, मसूर डाळ, काळे वाटाणे, उडीद डाळ, तूर डाळ इत्यादी. यात मुग डाळ एक अशी डाळ हे जी खूप जास्त हेल्दी समजली जाते. एवढेच नाही तर खुद्द आयुर्वेदात सुद्धा ‘क्वीन ऑफ पल्सेस’ असे मुग डाळीचे वर्णन केलेले आहे.

मुग डाळ जर एखाद्या मधुमेही रुग्णाने खाल्ली तर त्यामुळे ब्लड मधील शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. याचे कारण यात आढळणारे अँटीऑक्सिडेंट आणि अँटीडायबिटिक गुणधर्म होय. हे गुणधर्म रक्तात असणाऱ्या ग्लुकोजच्या प्रमाणाला कमी करतात. जर तुम्ही मधुमेहावर एखादा घरगुती उपाय शोधत असाल तर नक्कीच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा मुग डाळीचे काही दिवस सेवन करून पहा.

फोटोग्राफी एक सुंदर कला, जाणून घ्या जागतिक छायाचित्रण दिनाचे महत्त्व

डाळींचा रोजच्या जेवणातला उपयोग फक्त आमटी किंवा वरणापुरताच मर्यादित नक्कीच नाही. अर्थात या आमटी आणि वरणाचेच कितीतरी प्रकार करता येतात. दोन-तीन डाळी एकत्र करून किंवा फोडणीत वेगवेगळ्या भाज्या घालून रोजचे वरणही चवदार करता येते. कढी, डाळींचे पीठ पेरलेल्या भाज्या, पीठ लावून केलेली ताकातली भाजी, ढोकळा, धिरडी, घावन, डाळींचे सूप असे इतर पदार्थ आहेतच की. शिवाय आपल्याकडे डाळींचे पुरण, डाळींचा हलवा, डाळीच्या रव्याचा शिरा, लाडू अशा गोड पदार्थाचीही वानवा नाही. प्रश्न इतकाच आहे की आपण रोजच्या आहारात डाळ वापरतो का? डाळी पचायला जड असल्यामुळे अनेक जण डाळींपासून दूर राहणेच पसंत करतात.

हेही वाचा : 

‘या’ कंपन्यांचे देशात अवघ्या 3 महिन्यांत 37 लाखांहून अधिक पीसी विकले गेले

Latest Posts

Don't Miss