spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

गौरीच्या नैवेद्याला करा हे खीरीचे दोन प्रकार

१९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. मोठ्या जल्लोषात आणि आनंदात गणेशोत्सोव साजरा केला जातो.

१९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. मोठ्या जल्लोषात आणि आनंदात गणेशोत्सोव साजरा केला जातो. गणपती आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी गणेशाची माता गौराईचे घरोघरी आगमन होते. गौरीच्या आगमनानंतर महिला वर्गात एक वेगळाच उत्साह निर्मण होतो. गौरीचे आगमन झाल्यानंतर तिची विधिवत पूजा केली जाते. तिला छान साडी आणि दागिने घालून सजवले जाते. गौरीचे आगमन आणि कौतुक करण्यासाठी सगळेजण उत्साहात असतात. पूजा झाल्यानंतर गौरीला नैवेद्य दाखवला जातो. पहिल्या दिवशीच्या नैवेद्यात भाकरी आणि भाजी दाखवली जाते. तर दुसऱ्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्यामध्ये जास्त करून पुरणपोळी दाखवली जाते. पण आपण पुरणपोळी सोबत खीरीचा पण नैवेद्य दाखवू शकतो. चला तर पाहुयात सोप्या पद्धतीने बनवायची खीर

बदाम खीर –

साहित्य:-
साल काढून घेतलेले १०० ग्रॅम बदाम, खवा (अर्धा वाटी) , फुल क्रिम मिल्क (१ वाटी) , वेलची पावडर ( चवीनुसार) , साखर ( अर्धा वाटी )

कृती:-
सर्वप्रथम साल काढून घेतलेले बदाम पाण्यात भिजवून ठेवावे. पाच ते सहा तास भिजवून झाल्यानंतर त्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी. त्या पेस्ट मध्ये पाणी टाकू नये. त्यानंतर गॅसवर एक पातेली ठेवून त्या दूध ओतून घ्या. आणि त्या दुधाला चांगली उकळी काढून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात खवा आणि साखर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्याला चांगली उकळी काढून घ्या. थोड्या वेळाने त्यात बदामाची पेस्ट घालून सतत मिक्स करत राहा. ती चांगली जाड झाल्यानंतर त्यात चवीनुसार वेलची पावडर घालून घ्या. तयार आहे बदामाची खीर. बदामाची खीर थंड करून खाल्यास अजून छान लागते.

साऊथ इंडियन पायसम

साहित्य:-

फुल फॅट दुध(२ वाटी) , साखर (१ वाटी) , ड्रायफ्रुट्स (आव्श्क्तेनुसार) , भाजलेल्या शेवया, केशराच्या काड्या(आव्श्क्तेनुसार) , वेलची पूड(आव्श्क्तेनुसार)

कृती:- 
सर्वप्रथम गॅसवर वर कढई ठेवून त्यात दूध ओतून घ्यावे आणि ते गरम करण्यासाठी ठेवावे. दूध चांगलं गरम झाल्यानंतर त्यात भाजलेल्या शेवया टाकून घ्याव्या. शेवया टाकून झाल्यानंतर नीट मिक्स करून घ्या. शिव्या शिजल्यानंतर त्यात साखर घालून पुन्हा नीट मिक्स करून घ्या. साखर वितळल्यानंतर त्यात चवीनुसार वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालून नीट मिक्स करून घ्या. आणि सगळ्यात शेवटी त्यात केशराच्या २ किंवा ३ काड्या टाकून घ्या. तयार आहे साऊथ इंडियन पायसम.

Latest Posts

Don't Miss