Friday, May 3, 2024

Latest Posts

हे विचित्र खाद्यपदार्थ कधी खाऊन पाहिलेत का?

परंतु आम्ही तुमच्या साठी खाण्यायोग्य मॅश-अप आणले आहे. आम्ही तुम्हाला भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळे पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्याला सर्वानाच काही ना काही खाद्यपदार्थ खाण्याचं वेड असतं. आपण सोशल मीडिया(Digital Media) वर असेच काही पदार्थ आपण नेहमीच पाहत असतो. तसेच विचित्र खाद्यपदार्थाचे कॉम्बो (Combo) फूड ब्लॉगरही(food blogger) सोशल मीडियावर टाकत असतात. परंतु आम्ही तुमच्या साठी खाण्यायोग्य मॅश-अप आणले आहे. आम्ही तुम्हाला भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळे पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला नक्कीच आवडतील याची आम्हाला खात्री आहे.

गुजरातचा आईस्क्रीम(Ice-Cream)वडापाव

गुजरातमधील एका स्ट्रीट फूड(Street Food) विक्रेत्याने दोन वर्षाआधी आईस्क्रीम वडापाव विकून देशाला धक्का दिला आहे. तो पावच्या आत वेगवेगळे गोड सरबत ओतून आणि वड्याऐवजी तो आईस्क्रीमची स्कूप भरून त्यात टूटी फ्रुटीचा फायनल टच देऊन लोकांना खाऊ घालतो.

शेझवान डोसा

डोस्याचे विविध प्रकार आहेत. पण शेजवान डोसा हि एक मनोरंजक पाककृती आहे. हा पदार्थ देशभरात वेगवेगळ्या डोशाच्या स्ट्रीट फूडचे स्टॉल आहेत आणि ज्यांना त्याच्या सध्या डोसाला चायनीज ट्विस्ट द्यायला आवडेल त्यांनी नक्कीच ट्राय करायला पाहिजे.

वडोदराचा कोला एग फ्राईड राइस (Cola Egg Fried Rise)

वडोदरा येतील भाऊ ऑम्लेट सेंटर त्यांच्या अंड्याच्या अनेक पाककृती ओळखल्या जातात. एग फ्राईड राईस हा पदार्थ ३० स्क्रॅम्बल्ड अंडी, तांदूळ आणि कोको कोलापासून बनवलेल्या तळलेल्या तांदळाचे मिश्रण आहे. ऐकायला विचित्र वाटतंय. पण ते म्हणतात कि त्याची चव चांगली आहे.

सुरत चा चॉकलेट(Choclate) समोसा पाव

गुजरातमधील आणखी एका रेस्टॉरंटच्या मालकाने चॉकलेट- सॉल्टेड स्नॅकची असामान्य रेसिपी आणली आहे. इकडे पावावर चॉकलेट सॉस टाकून त्यामध्ये चोको फज भरलेला समोसा ठेवून चॉकलेट सामोसा समोसा पाव बनवला जातो.

मिरिंडा पाणीपुरी

विचित्र पदार्थांमध्ये या यादीत पुढे विचित्र पदार्थ आहे तोच म्हणजे मिरिंडा पाणीपुरी जयपूरमधील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्रेत्याचा विडिओ एक फूड ब्लोग्गर ने सोशल मीडिया वर टाकला होता. या विडिओ ला भरभरून प्रतिसाद आला होता आणि त्या विडिओ ला लाखो व्ह्यूज मिळाले होता. तुम्हाला नाव ऐकून फार वेगळं वाटत असेल परंतु खाद्यप्रेमी खाऊन थक्क झाले आहेत.

हे ही वाचा:

मेथी ही आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?

Vegan eggs आणि कोंबडीच्या अंड्यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या अंड्याच्या विगन प्रकाराबाबत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss