Tuesday, May 7, 2024

Latest Posts

नाश्तासाठी शेवयाचा उपमा नक्की ट्राय करा !

सकाळी उठल्यावर खूप भूक लागते. उठल्यावर नेहमी एकच प्रश्न पडतो आजचा नाश्ता काय? पोहा, उपमा, डोसे खाऊन कंटाळा येतो. सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे हे सांगण्यात येते. पोटभर नाश्ता केला तर दिवसभर उत्साह वाटतो. त्यामुळे एक झटपट रेसिपीबद्दल सांगणार आहोत. तुम्ही कधी शेवयाचा उपमा केला आहे का? शेवयाचा उपमा हा चवीला उत्तम आणि हेल्दी असतो. शेवयाचा उपमा बनवायला खूप सोप्पा आहे. शेवयाचा उपमा अगदी कमी वेळेत बनवून तयार होतो. चला तर मग जाणून घेऊयात शेवयाच्या उपमाची रेसिपी.

साहित्य

शेवया
कांदा, टॉमेटो, शिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर
कोथिंबीर
मिरची
चवीनुसार मीठ

कृती –

एका भांड्यामध्ये पाणी उकळवत ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाका. नंतर त्यामध्ये शेवया शिजवायला टाका. शेवया शिजवल्यावर पाणी काढून टाका. नंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची आणि कापलेला कांदा परतवून घ्या. वाटाणे, फरसबी, गाजर, शिमला मिरची यासारख्या भाज्या घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये शेवया घाला. शेवया घालून नीट एकत्र करून घ्या. त्यामध्ये थोडे पाणी घालून नीट शिजवून घ्या. वरून मीठ आणि कोथिंबीर टाका. तयार आहे शेवयाचा उपमा.

 

हे ही वाचा:

इतका संघर्षमय होता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास

Sachin Tendulkar Birthday:मास्टर ब्लास्टरचा आज जन्मदिवस, झाला ‘इतक्या’ वर्षाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss