Saturday, May 4, 2024

Latest Posts

पोह्यांपासून बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ

संध्याकाळच्या नाश्ताला काय बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो. रोज रोज तेच पदार्थ खायला कंटाळा येतो. चहासोबत जर चटपटीत पदार्थ मिळाला तर मज्जा येते. अश्याच हेल्दी रेसिपी आज आम्ही सांगणार आहोत. पोहे हे चहासोबत असेच पण खाल्ले जातात. पण कधी पोह्यांपासून कटलेट तयार केले आहेत का? हे कटलेट तयार करणं खूप सोपे  आहेत. घरच्या घरी कमी वेळेत हे कटलेट बनून रेडी होतात. चला तर मग जाणून घेऊयात पोहे कटलेटची रेसिपी.

साहित्य

  • पोहे
  • कोथिंबीर
  • जिरे
  • लसूण
  • अद्रक
  • हिरवी मिरची
  • शिमला मिरची
  • तांदळाचे पीठ
  • उकडलेले बटाटे
  • कॉर्न फ्लॉर

कृती

सर्वप्रथम उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करून घ्या. त्यानंतर पोहे स्वच्छ धुऊन घ्या. पोह्यांचे पाणी काढून पोहे आणि बटाटे एकत्र करा. कोथिंबीर, जिरे, लसूण, आलं, हिरवी मिरची, शिमला मिरची, लाल तिखट, हळद हे पदार्थ त्या बटाटा आणि पोह्यांच्या मिश्रणात टाका आणि नरम पीठ मळून घ्या. या टिक्कीला कोट करण्यासाठी एका वाटीमध्ये कॉर्न फ्लॉर, मीठ पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणाची टिक्की करून घ्या. टिक्की तयार केल्यावर कॉर्न फ्लॉरच्या पेस्टमध्ये मिसळून घ्या. नंतर ब्रेडचा चुरा करून त्या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ती टिक्की घोळवून घ्या. सर्व टिक्की अशाप्रकारे तव्यात शॅलो फ्राय किंवा फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करा. तयार आहे पोहा टिक्की. ही टिक्की चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा:

कच्च्या कैरीपासून बनवलेला ‘हा’ पदार्थ नक्की ट्राय करा

पैंजण आणि जोडव्यांचे महत्त्व आहे तरी काय?

 Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss