Friday, May 3, 2024

Latest Posts

काहीतरी चमचमीत खायची इच्छा होतेय तर, घरबसल्या बनवा Chole Kulche

रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या प्रत्येकाला कंटाळा येतो. काही जणांना तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही खाता येत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाची कधी कधी बाहेरील स्ट्रीट फूड खायची इच्छा होत असते. पण बऱ्याच वेळा आरोग्याचा विचार करून आपल्याला ते खाता येत नाही.

रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या प्रत्येकाला कंटाळा येतो. काही जणांना तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही खाता येत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाची कधी कधी बाहेरील स्ट्रीट फूड खायची इच्छा होत असते. पण बऱ्याच वेळा आरोग्याचा विचार करून आपल्याला ते खाता येत नाही. पण हे स्ट्रीट फूड तुम्ही घरीच बनवू शकलात तर तुम्हाला कसलीही काळजी न करता एका उत्तम मेजवानीचा आस्वाद घेता येईल. म्हणून आज आपण बघणार आहोत छोले कुलचे कसे बनवायचे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर छोले कुलचे खाले जातात. छोले कुलचे (Chole Kulche) हे पंजाबमधील प्रसिद्ध खाद्य पदार्थ आहे. तर आपण बघुयात छोले कुलचे कसे बनवायचे

रेसिपी बनवण्यासाठी साहित्य –

२ कप सुके वाटाणे ६ तास भिजत ठेवा
२ हिरव्या मिरच्या
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१ टीस्पून लिंबाचा रस
१/२ टीस्पून आमचूर पावडर
२ चमचे चाट मसाला
१/३ टीस्पून गोड सोडा
१/४ टीस्पून हळद
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ

पाककृती

  • कुलचा (Kulcha) बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका भांड्यात २०० गव्हाचे पीठ किंवा मिक्स पीठ चाळून घ्या . त्यात एक चमचा खायचा सोडा अर्धी वाटी दही(curd ), आणि चवीनुसार मीठ टाकून एकत्र मिसळा. आता कोमट पाण्याने हे पीठ मऊ पद्धतीने मळून घ्या. आता हे तयार पीठ कापडाने झाकून ५ तास मुरात बाजूला ठेवा. सुमारे ५ तासांनंतर लुसलुशीत पीठ कुलचा बनवण्यासाठी तयार होईल.
  • आता प्रेशर कुकरमध्ये वटाणे, खायचा सोडा, अर्धा चमचा हळद (Turmeric), थोडे मीठ टाकून २ कप पाणी घाला व कुकरचे झाकण लावा . त्यांनतर गॅस मध्यम आचेवर करून त्यावर कुकर ठेवा. वाटणे उकळण्यासाठी ४-५ शिट्या कराव्या. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून भांडे उघडून त्यातील वाटणे स्मॅश करा. आता त्यात कांदा, हिरवी मिरची (Green Chilli), टोमॅटो (Tomato), चाट मसाला(Chaat Masala), आमचूर (Amchur) पावडर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून त्यात लिंबाचा रस घाला वाटणे ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.

  • मटर चाट (peas) एका भांड्यात काढा व हिरव्या कोथिंबिरीने (green coriander) सजवा. यानंतर, आधीच मळलेले पीठ पुन्हा एकदा मळून घ्या आणि त्याचे १२-१६ समान गोळे करा. आता एक गोळा घेऊन त्याला जाडसर गोल पोळीसारखा आकार देत त्यावर थोडी कोथिंबीर टाकून पोळी लाटून घ्या.आता मध्यम आचेवर तवा गरम करून त्यात थोडे तेल घालून ग्रीस करा. आता तयार केलेला कुलचा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. कुलचा भाजल्यानंतर प्लेटमध्ये ठेवा आणि मटार बरोबर सर्व्ह करा.

हे ही वाचा:

राजन विचारे, ठाकरे गटाचे शिवसैनिक आनंद आश्रमात दाखल

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss