Friday, May 3, 2024

Latest Posts

Lasagne Recipe, तुम्ही कधी लाजानिया खाल्लं आहे का ?

Lasagne Recipe - रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही अनेकदा लाजानिया खाले असेल. लाजानिया हि एक इटालियन डिश (Italian dish)आहे. चीज, क्रीम आणि व्हाईट सॉसने तयार केलेला हा लाजानिया खूप चवदार लागतो.

Lasagne Recipe – रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही अनेकदा लाजानिया खाले असेल. लाजानिया हि एक इटालियन डिश (Italian dish)आहे. चीज, क्रीम आणि व्हाईट सॉसने तयार केलेला हा लाजानिया खूप चवदार लागतो. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बनवलेल्या लजानियाची रेसिपी खूप सोपी आहे. हा लाजानिया बघितल्यास तुम्हाला तो बनवणे कठीण वाटत असेल पण असे नाही आहे. लाजानिया घरी बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा लाजानिया तुम्ही घरीही बनवू शकता. टोमॅटो केचप, व्हाईट सॉस आणि भाज्या देखील लाजानियामध्ये वापरल्या जातात.

साहित्य –

१/५वाटी मैदा
१ चमचा ओरिग्यानो
१ टीस्पून चिली फ्लेक्स
१ टीस्पून मिरपूड
१ टीस्पून बेझेल लिव्ह
२ टेबलस्पून बटर
मॉझरेला चीज
क्यूब चीज
२ ढबु मिरची
४ टोमॅटो
लसूण पाकळ्या चार ते पाच
कोबी
पनीर
मशरूम
कांदा
मिरेपूड

पाककृती

  • सर्वात प्रथम मैद्यामध्ये थोड मीठ घालून मैद्याचे पीठ मळून घ्या. याच्या पातळ ५ पोळ्या लाटून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी हलक्या शेकून घ्या.
    चार टोमॅटो (tomato) घेउन बारीक काप करुन घ्या. कढईमध्ये तेल किंवा बटर (butter) घालुन यामध्ये टोमॅटो फोडणीला घाला. त्यानंतर त्यात चिली फ्लेक्स (Chili flakes) घाला आणि टोमॅटो मऊ शिजवून त्याची प्युरी करून रेड सॉस बनवा.
  • कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. यामध्ये एक चमचा बटर घाला आणि एक चमचा मैदा (flour) घाला आणि चमच्याने मिक्स करून घ्या. यामध्ये दोन वाट्या दूध (milk) ओता. २ क्यूब चीज (chees ) घाला आणि मिक्स करा. सतत हलवत राहा नाही तर याच्या गुठळ्या तयार होतील. गॅस बंद करा तुमचा व्हाइट सॉस (white Sauce) तयार झाला असेल.
  • आता कढईत तेल किंवा बटर गरम करा. सर्व बारीक चिरलेल्या भाज्या यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. सर्वात प्रथम कांदा (onion ) टाका नंतर शिमला मिरची (Capsicum), कोबी(Cabbage), पनीर(paneer), मशरूम (mushroom) अश्या सर्व भाज्या फ्राय करून घ्या जास्त शिजवू नका यामध्ये मीठ,मिरपूड, चिली फ्लेक्स घाला.

  • प्रथम टोमॅटो प्युरी (Tomato puree) डिशच्या बेसवर ठेवा. मग लाजानिया (lasagna)पट्टी ठेवा. वर भाज्यांचा पातळ थर लावा. त्यावर चीज टाका. अशा प्रकारे एकावर एक असे पाच थर करा.
  • सर्वात वरच्या थरावर व्हाईट सॉस आणि टोमॅटो सॉस (tomato sauce )घाला. चीज घाला आणि बेक करण्यासाठी प्रीहेटेड ओव्हनमध्ये ठेवा. सुमारे २५ ते ३० मिनिटे बेक करावे. आणि नंतर गरमागरम सर्व्ह करा.

हे ही वाचा:

अभिनेत्री रकूल प्रीतने शेअर केले तिच्या नवीन लुकचे खास फोटो

पठाण चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss