Sunday, May 19, 2024

Latest Posts

चविष्ट पदार्थ खायची आवड आहे? तर बनवा घरच्या घरी हे चविष्ट “मेथीचे मुटके”

सतत भाजी आणि पराठे खाऊन कंटाळा येतो. तर ब्रेकफास्टसाठी गरमागरम मुटके हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे मुटके हेल्दी आणि पोटभरण्याचा उत्तम पर्याय असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे मुटके आवडीने खाऊ शकतात.

शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवायचं असेल तर रोजच्या आहारात पालेभाज्या या खायलाच हव्यात. पालेभाज्यांमधून शरीराला व्हिटॅमिन्स,लोह,मिनरल्स, कॅल्शियम असे अनेक प्रकारचे शरीरासाठी महत्वाचे घटक मिळतात. त्यातच एक महत्वाची पालेभाजी म्हणजे मेथी. शकतो काही लोकांना पालेभाज्या आवडत नाहीत,पण मेथी यासाठी अपवाद आहे. बऱ्याच लोकांना मेथी आवडते. आई ज्यांना मेथी अवफत्त नाही त्यांनी आजची हि रेसिपि करून पहिली तर त्यांना देखील मेथी आवडायला लागेल. मेथी ही पालेभाज्यांमधील अतिशय पौष्टीक अशी भाजी. यामध्ये विविध प्रकारची व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळतात त्यामुळे आहारात या भाजीचा समावेश असणं महत्वाचं आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

मेथी म्हटल्यावर आपण एकतर त्याची भाजी करतो नाहीतर मेथीचे पराठे. पण सतत भाजी आणि पराठे खाऊन कंटाळा येतो. तर ब्रेकफास्टसाठी गरमागरम मुटके हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे मुटके हेल्दी आणि पोटभरण्याचा उत्तम पर्याय असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे मुटके आवडीने खाऊ शकतात. संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या खाऊच्या डब्यातही हे मुटके उत्तम पर्याय होऊ शकतात. चला तर पाहूयात हे मुटके करायची सोपी रेसिपी

साहित्य

* मेथी – एक मध्यम आकाराची जुडी

* तीळ – १ चमचा

* धणे-जीरे पावडर – अर्धा चमचा

* ज्वारीचे पीठ – १ वाटी

* बेसन – अर्धी वाटी

* तिखट – अर्धा चमचा

* आलं-लसूण पेस्ट – अर्धा चमचा

* मीठ – चवीनुसार

* तेल – २ वाट्या

* हिंग – पाव चमचा

* हळद – अर्धा चमचा

कृती

मेथी निवड़ून स्वच्छ धुवून तेलात थोडी परतून घ्या. त्यानंतर ही परतलेली मेथी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात ज्वारीचे पीठ आणि बेसन घाला. याऐवजी तुम्हाला हवी असेल तर थालिपीठाची भाजणीही घालू शकता. नंतर यामध्ये हिंग, हळद, तिखट, धणे-जीरे पावडर, तीळ, मीठ, आलं-लसूण पेस्ट सगळे जिन्नस घालून चांगले घट्ट पीठ मळून घ्या. त्यानंतर त्या पिठाचे हातानेच बारीक मुटके करा. गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा आणि त्यावर एखादी चाळणी ठेवून हे मुटके वाफवायला ठेवा. तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. मुटके वाफेवर नीट शिजले आहेत का हे पाहून त्यांना बाजूला कडून घ्या. त्यानंतर थोडे गार झाल्यानंतर तेलात तळून घ्या. नंतर हे गरमागरम मुटके दही, सॉस, हिरवी चटणी यांच्यासोबत सर्व्ह करा किंवा नुसते खाल्ले तरीही छान लागतात.

टीप: वाफवलेले मुटके ३ ते ४ दिवस टिकतात. त्यामुळे तुम्ही हवं तेव्हा ते तळून खाऊ शकतो.

हे ही वाचा:

Tata Consultancy Services ने जाहीर केले तिसऱ्या तिमाहीचे निकाल, जाणून घ्या कंपनीला मिळाला किती नफा?

उर्फीच्या ट्विटवर चित्रा वाघ पुन्हा संतापल्या, पवारसाहेब, सुप्रिया सुळेंना हा नंगानाच चालणार नाही

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, नितीन देशमुखांना एसीबीकडून नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss