Friday, May 3, 2024

Latest Posts

कोकणी स्टाईल बनवा पापलेट करी

Pomfret Curry : मासे म्हंटल की सर्वात पहिले आठवत ते म्हणजे समुद्रकिनारा. मासे म्हंटल की कोकण आठवत कारण कोकणातील समुद्र किनारे आणि तेथील मासे बनवण्याची पद्दत.जर तुम्ही मासे खाऊ असाल तर तुम्हाला हि पापलेट करी नक्की तरी करायला हवी मासे अनेक वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत त्यामधील आज आपण बनवणार आहोत पापलेट करी. चवीला अतिशय उत्तम असा हा मासा आहे. हि करी एकदम टेम्टिंटिंग बनते आपण ती करी भाकरी किंवा भातासोबत तरी केली तर मग मेजवानीच.

पापलेट करी बनवण्याचे साहित्य –

२ माध्यम आकाराचा पापलेट मासा १ मोठा कांदा १५-२० लसूण पाकळ्या थोडी कोथींबीर १.५ चमच लाल तिखट २ टोमॅटो थोडी चिंच (पाण्यात भिजत घालणे) 2 चमचे तेल चवीनुसार मीठ पापलेट करी

बनवण्याचे कृती –

सर्वात आधी पापलेट माशाला तिखट आणि मीठ लावून घ्यावे म्हणजे ते चांगले त्या मध्ये मिसळेल. आता एक कढई घ्या त्यामध्ये २ चमचे तेल टाका. त्यानंतर त्या मध्ये लसूण बारीक चिरलेला आणि कोथिंबीर टाकावी. त्यानंतर लसणाला थोडा रंग बदल कि त्यामध्ये वाटण टाकायचे आहे (वाटणामध्ये १ कांदा २ टोमॅटो वाटून घायचे आहेत) ते वाटण काढईमध्ये घालायचे आहे वाटण घातल्यावर त्या मध्ये लाल तिखट घालायचे आहे त्यानंतर त्यामध्ये भिजत घातलेली चिंच टाकायची आहे. चिंच टाकल्यावर त्या मध्ये थोडे पाणी टाकावे. त्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ थोड कमी टाकायचे आहे कारण आधी आपण माशाला लाल तिखट आणि मीठ टाकले आहे. त्या नंतर ती ग्रेव्ही एकत्र मिक्स करून घ्यावी. आणि नंतर त्यामध्ये ते माश्याचे तुकडे टाकावेत. त्याला उकळी येई पर्यत शिवायचे आहे. मग तयार होईल तुमची चवदार टेम्बटिंग पापलेट करी.

हे ही वाचा:

हिवाळ्यात चिकन खाताय तर बनवून बघा ‘Kashmiri Rogan Josh’

घरच्या घरी बनवा चविष्ट दहीवड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss