Thursday, May 16, 2024

Latest Posts

जन्माष्टमीला घरी दही लावताय ? मग या गोष्टी नक्की जाणून घ्या

अवघ्या २ दिवसांवर जन्माष्टमी म्हणजेच कृष्णजन्मोत्सव सण आला आहे. गोकुळाष्टमी हा सॅन संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी १८ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे

अवघ्या २ दिवसांवर जन्माष्टमी म्हणजेच कृष्णजन्मोत्सव सण आला आहे. जन्माष्टमी हा सण संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी १८ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे तर या दिवशी अनेक जण उपवास धरतात आणि श्रीकृष्णाच्या जन्मानंतर रात्री उपवास सोडतात. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर रात्री उपवास सोडतात. या दिवशी बाळकृष्णाच्या नैवेद्यासाठी दही हा सर्वात महत्वाचा पदार्थ आहे आणि म्हणून अनेक जण घरी दही बनवण्यास प्रथम प्राधान्य देतात

दही हे बालकृष्णाला खूप प्रिय असल्याचं मानलं जातं. दही खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. तसेच दही खाल्याने आपल्या शरीराला अनेक फायदा देखील होतात. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते, जे हाडे आणि दात तयार करण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते, तर ऑस्टिओपोरोसिस, आर्थराइटिस च्या रुग्णांना दह्याच्या नियमित सेवनातून फायदा होतो. आपण एकावेळी एक कप दही खाऊ शकतो. हे एक पौष्टिक, लोकप्रिय आणि सहज उपलब्ध अन्नघटक आहे. आपण हे मिष्टान्न म्हणूनदेखील खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी कमी फॅट्स आणि साखर असलेले दही खाऊ शकता. आपल्याला याचे बरेच गुण माहित आहेत, आपण प्रत्येकाने नियमितपणे ते खावे.

दही हे बालकृष्णाला खूप प्रिय असल्याचं मानलं जातं. दही खाणे आरोग्यासाठी उत्तम असते कारण दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. तसेच हे पचनशक्तीसाठी देखील चांगले असल्याचे मानले जाते. म्हणूनच बरेचसे लोक याचा जेवणात वापर करतात. दह्याचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही, तर अनेक प्रकारच्या पाककृती, त्वचा आणि केसांच्या मजबुतीसाठी केला जातो. म्हणून आपल्याला बहुतांश घरात दही पाहायला मिळते.

घट्ट आणि चवदार दही बनवण्याच्या सोप्या टिप्स – 

  • घट्ट आणि क्रीमी दही बनवण्यासाठी टोन्ड दुधाचा किंवा साय काढलेल्या दुधाचा वापर करा.
  • विरजण गरम दुधात घाऊ नका त्यामुळे दही पातळ आणि चवीला आंबट होईल.
  • तुम्ही वापरत असलेले विरजण आंबट नसल्याची खात्री करा.
  • ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करता त्यात दही लावू नका.
  • हिवाळ्यात दही बनव्यासाठी तुम्हाला जास्त विरजण लागेल. त्याचबरोबर उन्हाळापेक्षा हिवाळ्यात दही बनण्यासाठी वेळही जास्त लागतो.
  • दूध घालण्याआधी विरजण नीट फेटून घ्या. त्यामुळे दही नीट बनेल नाहीतर गुढळ्या तयार होतात.
  • दूध अतिशय थंड किंवा गरम असू नये. त्यामुळे दही पातळ आणि लिबलिबीत होईल.
  • दही बनल्यावर ते फ्रिज मध्ये ठेवा. जास्त वेळ उघडे ठेऊ नका त्यामुळे ते आंबट होईल.
  • घरी बनवलेले दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नका.

तसेच तुमच्या घरी मायक्रोवेव्ह असाल तर तुम्ही त्याचा वापर करूनही दही बनवू शकतात

घाईच्या वेळी तुम्हाला जर दही लवकर बनवायचे असेल तर मायक्रोवेव्ह चा उपयोग करा. अर्धा लिटर दूध उकळून कोमट करा. मायक्रोवेव्ह च्या भांड्यांत २ चमचे विरजण घेऊन ते फेटा आणि त्यात कोमट झालेले दूध घाला. नीट मिक्स होईपर्यंत चमच्याने सतत ढवळत रहा. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवा. मायक्रोवेव्ह १८० डिग्रीवर २ मिनिटांसाठी प्रीहीट करा आणि मग बंद करा. बंद केलेल्या मायक्रोवेव्ह मध्ये दह्याचं भांड ठेऊन द्या. ३ ते ४ तासात दही तयार होईल. ही वेळ दुधाच्या प्रमाणानुसार बदलेल.

हे ही वाचा :-

कृष्ण जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या श्रीकृष्ण देवाची जन्मकथा

Latest Posts

Don't Miss