Monday, June 5, 2023

Latest Posts

राशिभविष्य,२० मे २०२३,आज कुटुंबियांना वेळ द्याल.त्यांच्या समवेत रममाण व्हाल.

आज कुटुंबियांना वेळ द्याल.त्यांच्या समवेत रममाण व्हाल. कुटुंबासाठी खर्च होतील. काही आर्थिक व्यवहार आज हातावेगळे कराल.

माझी रास

मेष – आज कुटुंबियांना वेळ द्याल.त्यांच्या समवेत रममाण व्हाल. कुटुंबासाठी खर्च होतील. काही आर्थिक व्यवहार आज हातावेगळे कराल.

वृषभ – खुप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा हा उत्साहपूर्ण दिवस आलेला आहे.योग्य नियोजन करून आजचा दिवस व्यतीत कराल.आज जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मिथुन – आजचा दिवस काहीसा खडतर असेल. आज काही अनावश्यक खर्च उद्भवण्याची शक्यता राहिलं.काही मानसिक तणाव जाणवेल.

कर्क – आजचा दिवस हा यशप्राप्तीचा,लाभप्राप्तीचा, इच्छापूर्तीचा आहे. आज मित्र परिवारात रममाण व्हाल.सर्वांना आपला सहवास हवाहवासा वाटेल.

सिंह – आज आपले काम चोखपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.आज कामे भरपूर मात्र वेळ कमी अशी काहीशी अवस्था होईल.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या – आज अनपेक्षित सौख्यप्राप्ती, आनंदप्राप्तीचा दिवस असेल. नशीबाची, दैवाची साथ मिळेल.आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या.

तुळ – आजचा दिवस काहीसा कष्टदायक जाऊ शकतो. काही अनावश्यक चिंता सतावतील. त्यामुळे इतरत्र लक्ष न देता केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे राहीलं.

वृश्चिक – आजच्या दिवशी सुखी दांपत्य जीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराला भरभरून वेळ द्याल. जोडीदाराचेही प्रेम व सहकार्य लाभेल. व्यावसायिकांसाठीही आश्वासक दिवस असेल.

धनु – आजच्या दिवशी काहीशी शारीरिक अस्थिरता जाणवेल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नये. हितशत्रू, स्पर्धक कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील. संयम बाळगणे आवश्यक राहील.

मकर – आजचा दिवस हा मनोवांछित लाभप्राप्तीचा आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. आज संततीला देखील आपला वेळ द्याल.

कुंभ – आज मनात असलेल्या सौख्याची प्राप्ती होऊ शकते. घरातील काही महत्त्वाची कामे आज पूर्णत्वास न्याल. काही सेवाभावी संस्थांना मदत कराल.

मीन – आज काही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहील. आज काही धाडसी, सकारात्मक निर्णय घ्याल. मात्र निर्णय घेताना ज्येष्ठ व्यक्तींचे मत विचारात घेणे फायद्याचे राहील.

माऊली जोतिष कार्यालय.
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss