Monday, May 6, 2024

Latest Posts

लोकसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान, अमरावतीसह अन्य ठिकाणी मतदान सुरू

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी एका युवा तरुणाने त्याचा मतदान हक्क बजावला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी एका युवा तरुणाने त्याचा मतदान हक्क बजावला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अमरावती मतदारसंघात एकूण १८ लाख ३६ हजार ०७८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यासाठी १ हजार९८३ मतदान केंद्र असणार आहेत. अमरावती मध्ये ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे व प्रहारचे दिनेश बुब यांच्यात लढत होणार आहे.

अमरावती जिल्ह्यात सहा विधानसभ मतदारसंघांचा समावेश असून, जिल्ह्यात सर्वाधिक ३५४ मतदान केंद्र मेळघाटात आहेत. यावेळी मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आज असणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधतांना बच्चू कडू म्हणाले की, आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढत आहोत. मला एकच अपेक्षा आहे मतदारांकडून की, ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्यासाठी लढत आहोत. तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी. निश्चितच ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर हे आम्हला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल. जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुरांच्या नावावर असणार आहे, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले. बुलढाणा लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष एकूण २१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. मात्र, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात तिहेरी लढत होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकर हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. रविकांत तुपकर आणि त्यांची पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी आपल्या सावळा या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. ”लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते. आयुष्यामधील पहिली निवडणूक मी लढतो आहे आणि जनतेचा मला भरभरून पाठिंबा मिळत आहे. जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हाचं बटन दाबताना मला आनंद मिळाला, खूप चांगलं वातावरण आहे. चटणी भाकरी खाऊन जनतेने माझा प्रचार केला. जनतेचे उपकार मी कधीही विसरणार नाही. जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे आणि जनतेचा विजय होणार आहे. तरुण-तरुणी, वृद्ध महिलांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा”, असे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आवाहन केले आहे.

यासोबतच, महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक ही देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक असते. देशाचा प्रधानमंत्री कोण? हे आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून ठरवायचं असतं. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी मतदान करावं. मी केलेली काम, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि विकास काम यामुळे मला १००% खात्री आहे की मी पुन्हा निवडून येईल, असा विश्वास माध्यमांशी बोलतांना रामदास तडस यांनी व्यक्त केला.

 

हे ही वाचा:

MNS च्या पदाधिकाऱ्यांना ठोस सूचना, Mahayuti ला पाठिंब्याबाबत मांडली पक्षाची भूमिका

Sangali जिल्हा Congress ला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss