Sunday, May 5, 2024

Latest Posts

Sangali जिल्हा Congress ला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही: Nana Patole

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (गुरुवार, २५ एप्रिल) झालेल्या सांगली (Sangali) जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी मेळाव्यात बोलत असताना, ‘सांगली जिल्हा काँग्रेसला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही’ असे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangali Loksabha Constituency) महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचा उमेदवार न दिल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

यावेळी ते म्हणाले, “लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला ज्यांनी द्रष्ट लावण्याचे काम केले त्याची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही,” अशा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “आजची लढाई वेगळी आहे, देशावर मोठे संकट आहे, चुकून जर मोदी सरकार पुन्हा आले तर भविष्यात निवडणूक होणार नाही. मोदी सरकारने १० वर्षात विरोधी पक्षांना प्रचंड त्रास दिला. सोनियाजी गांधी यांना ईडी कार्यालयात तासंतास बसवले, राहुल गांधी यांनाही ईडी कार्यालयात चौकशीच्या नावाखाली पाच दिवस १०-१० तास बसवले अशा मोदी सरकारला माफ करणार आहात का? सोनियाजी गांधी यांनी देशासाठी कपाळाचे कुंकू दिले, देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी पंतप्रधानपदही नाकारले हे लक्षात ठेवले पाहिजे.”

या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

Narendra Modi यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली, Hussain Dalwai यांची घणाघाती टीका

MNS च्या पदाधिकाऱ्यांना ठोस सूचना, Mahayuti ला पाठिंब्याबाबत मांडली पक्षाची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss