Friday, May 3, 2024

Latest Posts

कशातही मन एकाग्र होत नाही, लक्ष थाऱ्यावर नसते तर, हे उपाय नक्की करून बघा

ऋषीमुनी, योगी हे प्राचीन काळापासून मन एकाग्र करायचे असे आपण ऐकले आहे . एकाग्रतेचे भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. प्राचीन काळापासून ध्यान करणे मन एकाग्र करणे या गोष्टी चालत आल्या आहेत. बऱ्याच जणांना याचे रहस्य माहित नाही. नेहमी लोक मन एकाग्र करण्यापासून लांब पळत असतात.

ऋषीमुनी, योगी हे प्राचीन काळापासून मन एकाग्र करायचे असे आपण ऐकले आहे . एकाग्रतेचे भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. प्राचीन काळापासून ध्यान करणे मन एकाग्र करणे या गोष्टी चालत आल्या आहेत. बऱ्याच जणांना याचे रहस्य माहित नाही. नेहमी लोक मन एकाग्र करण्यापासून लांब पळत असतात. पण या कलीयुगात एकाग्रता हि अत्यंत आवश्यक आहे. जगात चालेल उद्रेक, भ्रष्टाचार बघता भविष्यात येणाऱ्या पिढीचे जगणे कठीण होणार आहे. एकाग्रतेमुळे आपली कठीण कामे सहज रित्या पार पडतात. आजही बऱ्याच लोकांना आव्हानात्मक काम करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात. महत्त्वाच्या परीक्षेचा अभ्यास करणे असो, मोठ्या प्रोजेक्टवर काम करणे असो. आपल्याला ते एखादे विशिष्ट काम करण्याची इच्छाशक्ती असते मात्र लक्ष कसे केंद्रित होत नसते किंवा कसे करावे हे माहित नसते.जीवनात यश मिळवण्यासाठी एकाग्रतेचे फार महत्व आहे. तर आपण समजून घेऊयात एकाग्रता म्हणजे काय
एकाग्रता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती मानसिक प्रयन्त करतो यावर आपली अवलंबून असते किंवा निदर्शनास येते. कित्येक जण याला फोकस असे म्हणतात. पण हा फोकस म्हणजे नेमकं काय हे समजण्यास आपण गल्लत करतो व हातात आलेल्या गोष्टी निसटून जातात

एकाग्रता (concentration) व फोकस (focus) कसा वाढवावा

  • १. मेंदूला प्रशिक्षित करा (Train our brain) – मेंदूला प्रशिक्षित करण्यासाठी विवशिष्ट प्रकारचे गेम खेळले जातात. याने आपली एकाग्रता शक्ती वाढते. सुडोकू शब्दकोडे, बुद्धिबळ, जिगसॉ कोडे यासारखे गेम खेळायला हवे, यामुळे एकाग्रता वाढते व मेंदू चपळ होतो.
  • २ पुरेशी झोप घ्या (Get enough sleep) – झूप न लागणे हे मन शांत नसल्याचे सर्वात मोठे कारण आहे. झोप अपुरी असल्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते तसेच कशातही लक्ष लागत नाही यामुळे कार्यक्षमता कमी होते.

  • ३ नियमित व्यायाम करा (Exercise regularly) – नियमित व्यायाम करणे हे आरोग्यास नेहमी चांगले असते. व्यायाम करताना लागलेली शक्ती व लग्नाणाऱ्या एकाग्रतेमुळे तुमचा मेंदू तल्लक होतो. यामुळे व्यायामाची चांगली सवय शरीराला असणे गरजेचे आहे.

 

हे ही वाचा:

२५ जानेवारीला सलमान खान चाहत्यांना देणार डबल गिफ्ट, मोठ्या पडद्यावर रिलीज होणार ‘किसी का भाई किसी की जान’ चा टीझर

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार?, नरेंद्र मोदींना केली विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss