Monday, May 6, 2024

Latest Posts

ताऱ्यासारखे दिसणाऱ्या फळाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

या फळाला पाहिल्यावर बालपण जागे होते. कारण शाळेच्या समोर बोर, कैरी, चिंचेची गाडी समोर उभी असायची त्या गाडीवर हे फळ मसाला लावून मिळायचे. या फळाला स्टार फ्रुट (Star Fruit) असे म्हणतात. स्टार फ्रुट हे वर्षभर मिळत. हे फळ सर्वत्र उपलब्ध असते. या फळाचे दोन वेळा पीक येते. स्टार फ्रुटचा उपयोग हा फ्रुट सलाड, फ्रुट चाट साठी केला जातो. ड्रिंक्स, सॉस, चटणी इत्यादीसाठी पण केला जातो. नावाप्रमाणे हे फळ स्टार म्हणजेच कापल्यानंतर ताऱ्यांसारखे दिसते. या फळाचा रंग हा हलकासा हिरवा असा असतो. या फळाची चव आंबट, गोड, रसाळ अशी लागते. स्टार फ्रुट पिकल्यावर पिवळा दिसतो. हे फळ पूर्ण पिकल्यावर नारंगी रंगाचे दिसते.

हिंदीमध्ये या फळला कमरख असे म्हणतात. या फळाचे सेवन केल्यास शरीराला ‘क’ जीवनसत्व  (Vitamin ‘C’) मिळते. हे फळ सप्टेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान भारतात उपलब्ध असते. या फळाचा रस ताप आणि डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी केला जातो. हे फळ शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. चांगले पचन, दातदुखी, उलटी यांवर रामबाण उपाय आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. हे फळ खाल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार होत नाही. परंतु  किडीनीचा त्रास असलेल्या व्यक्तीने स्टार फ्रुट खाल्यास त्यांना हानी होऊ शकते.

हे ही वाचा:

बाप-लेक झळकणार एकाच चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

लतादीदींचा स्वर म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणारी तार – Amitabh Bachchan

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss