Friday, May 3, 2024

Latest Posts

पाणी पिताना करताय चुका तर आरोग्यास पडेल महागात

पाणी हे पृथ्वी वरील मूलभूत द्रव आहे. ज्या प्रकारे कोणतं अन्न चे सेवन करावे असा प्रश्न आपल्याला पडतो तसेच कोणते पाणी प्यावे आणि कसे प्यावे हा प्रश्न का पडत नाही?

पाणी हे पृथ्वी वरील मूलभूत द्रव आहे. ज्या प्रकारे कोणतं अन्न चे सेवन करावे असा प्रश्न आपल्याला पडतो तसेच कोणते पाणी प्यावे आणि कसे प्यावे हा प्रश्न का पडत नाही? आहाराने जसे आपले शरीर सुदृढ राहते तसेच पाणी प्यायल्याने सर्व क्रिया व्यवस्थित होतात. रक्ताभिसरण. झालेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर, अन्नाचे पचन, शरीराचे शुद्धीकरण या सर्व क्रिया व्यवस्थित होण्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. म्हणूनच पाण्याला जीवन म्हंटले जाते. आपल्या शरीरातील पाण्याची गरज अन्य कोणत्याही वस्तू भागवू शकत नाही. अन्न नसेल तर माणूस काही काळ काडू शकतो पण पाणी नसेल तर त्याच्या जीवावर बेतेल. म्हणूनच योग्य प्रकारे पाणी शरीरात जायला हवे. पाणी कितीप्यावे आणि कसे प्यावे या बाबत आपण जाणून घेऊया.

  • आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाण्याचे पचन होण्यासही वेळ लागतो. गरम पाणी (hot water) पिण्यास हलके असते, परंतु गार पाण्याचे पचन होण्यास वेळ लागतो. यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
  • तहान लागते तेव्हा पाणी पिणे हि पाणी पिण्याची चांगली सवय आहे. यामुळे योग्य प्रमाणात पाणी शरीरात जाते. किडनी, पोटाची समस्या असल्यास जास्त पाणी पिणे हानिकारक असते.

  • अन्न पचनास (Digestion of food) वेळ लागतो त्याचप्रमाणे पाणी पचायलाही वेळ लागतो. गरम पाणी पचनास हलके असते व गार पाणी पचायला जड असते त्यामुळे जास्त गार पाणी पिऊ नये.
  • कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाण्याआधी पाणी पिणे अयोग्य असते, किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिणे हि चुकीचे असते. यामुळे जेवणताना थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे अन्नाचे पचन चांगले होते व जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यावे.
  • बसून पाणी पिणे (Sit and drink water) हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असते. बसून पाणी प्यायल्याने पाणी शरीरात सर्व अवयवांपर्यंत (organs)सहज पोहोचते. शरीरातील सर्व क्रिया नीटनेटक्या होण्यास मदत होते.

हे ही वाचा:

संजय राऊत म्हणाले, ही दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती

‘सँड शार्क’ भारतीय नौदलात सामील, आयएनएस वगीरवरून समुद्रात भारताची ताकद वाढली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss